Republic Day: नगरच्या ‘विशाल’ची दिल्लीच्या प्रजासत्ताक संचलनात भरारी

Republic Day: नगरच्या ‘विशाल’ची दिल्लीच्या प्रजासत्ताक संचलनात भरारी

अहमदनगर – न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजचा (New Arts Commerce and Science College) विद्यार्थ्यी विशाल भाऊसाहेब पगारे याची यावर्षी नवी दिल्ली (New Delhi) येथे होणाऱ्या मुख्य प्रजासत्ताक संचलनासाठी (Republic Day) निवड झाली आहे.

विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून वरिष्ठ विभागातून विशाल पगारे या एकमेव विद्यार्थ्यीची प्रजासत्ताक दिनी ‘पंतप्रधान रॅली’ व ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.

त्याला १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरूबक्ष, प्रसाकीय अधिकारी लेफ्ट. कर्नल रनदीप सिंग, सुभेदार मेजर लोकेन्द्र सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . बी. एच झावरे, एन.सी.सी.अधिकारी कॅप्टन पी. एस. भंडारी व लेफ्टनंट भरत होळकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या संचलनासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला संधी मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल विशाल पगारे याचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे,

उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर व विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य तसेच उपप्रचार्य डॉ . बी. बी. सागडे, डॉ.ए. इ. आठरे, डॉ . एस. बी. कळमकर व प्रबंधक बी. के. साबळे यांनी अभिनंदन केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube