Ahmednagar च्या नामांतरावर अहिल्यादेवीचे वंशज यशवंतराव होळकर म्हणतात…

  • Written By: Published:
Ahmednagar च्या नामांतरावर अहिल्यादेवीचे वंशज यशवंतराव होळकर म्हणतात…

अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.

जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत आहेत तसे या माध्यमातून सुरू असलेले शह-काटशहाचे राजकारणही दिसून येत आहे.

अहमदनगर नामांतर रथयात्रा; पडळकर-शिंदे विखेंचा गेम करणार ?

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आदी नेत्यांनी केली आहे. राज्य सरकारही यासाठी अनुकूल आहे. असे असताना या मु़द्द्यावर काही विरोधी मतप्रवाहही आहेत. यावर आज अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी आपली प्रतिकिया दिली.

युवराज यशवंतराव होळकर (Yuvraj Yashwantrao Holkar) यांनी आज रेणुका मातेचे दर्शन घेऊन रंगमहाल येथे भेट दिली. त्यावेळी नामांतरासाठी सुरु असलेल्या रथयात्रेवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. याशिवाय ते पुढे असं म्हणाले की जे सरकार अहिल्यादेवीचा वारसा पुढे नेण्यासाठी काम करेल आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube