Maharashtra Rain : राज्यात कुठं पाऊस अन् कुठं प्रतिक्षा? वाचा…

Maharashtra Rain : राज्यात कुठं पाऊस अन् कुठं प्रतिक्षा? वाचा…

Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाला असून आज राज्यातील कोकण भागात पावसाचा ऑरेंट अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पावसाच्या सरी बरसलेल्या नाहीत. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही भागात पावसाची प्रतिक्षा अशीच परिस्थिती आहे. ( Maharashtra Rain – Where is the rain in the state and where is the wait?)

पसंतीच्या कपाशी बियाण्यांचा बाजार उठला ! हंगामाच्या सुरुवातीलाच बियाण्यांचा तुटवडा; शेतकरी हतबल

सध्या राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कल्याण, ठाणे जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु होता. हवामानाच्या शक्यतेनूसार काही वेळासाठी कल्याणमध्ये पावसाने आराम घेतला होता. परंतू मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

‘त्या’ जाहिरातीवर दीपक केसरकरांचं मोठं विधान, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी…

पाऊस बरसत असलेल्या जिल्ह्यांमध्ये पर्यंटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या दिवशी नागरिकांनी पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. मुसळधार पावसाने बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांनी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी एकच गर्दी केल्याचं दिसून आलंय.

Nashik News: चाळीस लाखांची लाच मागितली ! दिंडोरीचा प्रांताधिकारी एसीबीच्या ‘जाळ्यात’

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नूकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ठाण्यात झाडे, घरांचे स्लॅब कोसळणे, तर कांदिवलीत बाथरुमचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=4kHPPxLzHfE

दरम्यान, एकीकडे राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसतोयं तर दुसरकीडे राज्यातील इतर भागांत अद्यापही पावसाची वाट पहावी लागत असल्याची परिस्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला चिंता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube