विधानपरिषदेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?, कुणाच्या वाट्याला किती जागा?
विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचा जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला अखेर समोर आला आहे. मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ही निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ‘महायुती’ म्हणूनच एकत्र लढणार असून, वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर एकमत झाले आहे. प्राथमिक चर्चेनुसार, भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांच्या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून, 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्याच्या राजकीय गणितांनुसार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या समन्वय समितीमध्ये चर्चा सुरू असून याच आठवड्यात जागावाटप पूर्ण केले जाईल, अशी माहिती आहे.
झुरळांची फौज संसदेच्या वाटेवर? कॉक्रोच जनता पार्टी लढवणार लोकसभा निवडणूक..
ज्या त्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्याबळावर महायुतीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा त्या जागेवर दावा, असे ढोबळ सूत्र ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजेच 12 जागा येत आहेत. मात्र, काही ठिकाणी पारंपरिक जागांची अदलाबदल देखील केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम बैठकीत या फॉर्म्युल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.
प्राथमिक चर्चेनुसार कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
1. भाजप (12 जागा): नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर.
2. शिवसेना (3 जागा): ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.
3. राष्ट्रवादी काँग्रेस (2 जागा): रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून
१७ जागांवर आधी कोण होते आमदार
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)