सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीच्या लग्नात अनेक मान्यवरांची गर्दी पण चर्चा रंगली पार्थ पवारांसोबत ‘ती’ मुलगी कोण?
सर्वाधित चर्चेतील एंट्री ठरली ती म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या एका काश्मिरी तरुणीची.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे (Sule) आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांचा विवाहसोहळा काल मुंबईत पार पडला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या या कन्येच्या विवाहसोहळ्यानिमित्त देशभरातील राजकीय वर्तुळातून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. कलाक्षेत्रातील दिग्गजांनीही या सोहळ्यासाठी उपस्थित राहत नवविवाहितांना शुभाशीर्वाद दिले. दरम्यान, या लग्नसोहळ्यात चर्चा रंगली ती पार्थ पवारांसोबत दिसलेल्या सुंदरीची.
या लग्नसोहळ्यात पवार कुटुंबापासून व्यवसाय, क्रीडा या आणि अशा अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध चेहऱ्यांनी हजेरी लावली. प्रत्येकाच्याच एंट्रीनं उपस्थितांचं लक्ष वेधलं. मात्र सर्वाधित चर्चेतील एंट्री ठरली ती म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या एका काश्मिरी तरुणीची. थेट पवार कुटुंबीयांसोबतच या विवाहसोहळ्यासाठी पोहोचल्यानं या तरुणीती चर्चा सुरू झाली. कायनात धर असं तिचं नाव. नक्की ती कोण आणि कुठली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
उपलब्यध माहितीनुसार कायनात धर मुळची काश्मीरची असून, ती सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. पवार कुटुंबाशी कायनात धरचे जवळचे संबंध आहेत. इतकंच नव्हे तर सुनेत्रा पवार काही काळाआधी काश्मीर दौऱ्यावर गेल्या असता तिथं कायनातच्याच घरी त्यांचा पाहुणचार करण्यात आला होता. पार्थ पवारांसोबत याआधीसुद्धा कायनात दिसली होती. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरातही त्या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती.
पवार कुटुंबाच्या सुखदु:खात कायनातनं कायमच साथ दिली असून, या कुटुंबासोबत तिचं सतत दिसणं, महत्त्वाच्या कार्यक्रमांना पवार कुटुंबासमवेत हजेरी लावणं, यामुळं सध्या कायनात धर चांगलीच चर्चेत आली आहे. राहिला मुद्दा रेवती सुळेंच्या विवाहसोहळ्याचा, तर कायनात इथं सुरेख अशा पारंपरिक पेहरावात पोहोचली होती. दरम्यान, कायनातबाबत आणखी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यानं सोशल मीडियावरही नेटकरी, ‘ही कोण?’ याच प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसत आहेत.