साखर कारखान्याची ‘ती’ अट शिथील होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश…

साखर कारखान्याची ‘ती’ अट शिथील होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश…

साखर कारखान्याच्या उभारणीसाठी असलेली 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. कारण 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आलीय. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलीय.

79 मृत्यू, 104 लोक गायब; ग्रीसच्या समुद्रात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला जलसमाधी

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्यावतीने कराड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेस ऊस वाहतूकदार संघटना आणि सरपंच परिषदेचा सहभाग होता. पदयात्रेत मोठ्या संख्यने शेतकरी ट्रॅक्टर आणि ट्राॅली घेऊन सहभागी झाले होते.

ऊस उत्पादक, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सदाभाऊ खोत यांनी ‘शेतकऱ्यांची वारी’ यात्रा काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदाभाऊ खोत यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर साखर कारखान्याबद्दलची ही अट शिथील करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

अजित पवारांना CM म्हणून फक्त 7 टक्के लोकांची पसंती; शिवतारेंनी डिवचलं

आता साखर कारखान्याच्या उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्यासाठी एक समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ऊसदर नियंत्रक समितीही तत्काळ स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार खात्याला दिले आहेत.

दरम्यान, शेतकरी कंपन्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube