तुम्ही मुख्यमंत्री होणार का? सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया ; 2014 पासून मी …

Supriya Sule On CM Post : डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सामील

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Supriya Sule On CM Post

Supriya Sule On CM Post : डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सामील होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाटाघाटी देखील सुरु असल्याचा दावा करण्यात येत आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएत सामील झाला तर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडून भाजपला देण्यात आला असल्याचा दावा देखील मीडिया अहवालात करण्यात येत आहे. तर आता या चर्चांवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगितलं आहे.

गेले 12 वर्षांपासून माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करु नका. 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय. मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही. मला फक्त दुख: एका गोष्टीचे आहे की, ज्या पॉलिसी मेकिंगसाठी मी संसदेत निवडून गेले, त्याबद्दल गांभीर्याने मला कोणीच विचारत नाही. मी सध्या चार जेपीसी समित्यांवर आहे. देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या वित्तीय समितीमध्येही माझा समावेस आहे. माझं भाग्य आहे की, राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, त्याच्यावर एखादा जरा कोणी प्रश्न विचारला तर मला अंत : करणापासून आनंद होईल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. चार जेपीसींमध्ये (JPC) देशपातळीवरील अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरु आहे. यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो असं माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

तोपर्यंत मी भाष्य करणार नाही – सुनील तटकरे

तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत यावर अधिकृतरित्या कोणी बोलत नाही, तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. आमचे महायुतीचे सरकार मजबूत आहे. आमच्याकडे 238 संख्याबळ आहे. सुप्रिया सुळे येणाऱ्या विधेयकाला 50 टक्के समान जागा मानणार असतील तर त्यांनी लोकसंख्येचा विचार न करता ते गृहीत धरलं पाहिजे. त्याचे मी एडीएत स्वागत करेन असं सुनील तटकरे म्हणाले.

2029 मध्ये 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकणार; ओमराजे निंबाळकरांनी स्वीकारलं चॅलेंज!-

follow us