तुम्ही राज्याचे नवे अर्थमंत्री होणार? जयंत पाटील स्पष्टच म्हणाले
Jayant Patil On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी काल (14 जुलै) रोजी राज्याचे मुख्यमंत्री
Jayant Patil On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी काल (14 जुलै) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या भेटीनंतर जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार याबाबत देखील तर्कवितर्क लावण्यात येत असताना आता जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अतिक्रमण व अनधिकृत प्रकरणी अपात्र ठरविण्यात आल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी पाच ते दहा मिनिटं चर्चा झाली. याच प्रकरणात मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते दिल्लीत असल्याने भेट झाली नाही असं माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
खासदार सुनील तटकरेंशी भेट नाही – जयंत पाटील
तर दुसरीकडे या भेटीदरम्यान मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो तिथे कोणीही नव्हते असं देखील जयंत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी सुनील तटकरेंशी (Sunil Tatkare) भेट झाली नाही अशी माहिती देखील जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली. यापूर्वी देखील पटले, तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा आणि विलिनीकरणाचा काही संबंध नाही असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.
श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद… संघटित टोळीवर मकोका लावा आमदार हेमंत ओगलेंची मागणी-
जयंत पाटील नवे अर्थमंत्री होणार ?
या भेटीनंतर जयंत पाटील नवे अर्थमंत्री होणार असा प्रश्न देखील या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, खाते वाटपाचा अधिकार मुख्मंत्र्यांचा असतो. जर आम्ही त्या पक्षात गेलो, तर अर्थमंत्री पद भेटेल पण आम्ही सर्व खासदार, आमदार शरद पवारांच्या पाठीशी एकसंघ आहोत. मात्र तरी देखील प्रसारमाध्यमांत यावर चर्चा होत असते याचा मला दुःख वाटते असं माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले.