धक्कादायक! दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधली होती महिला; कोल्हापुरातील प्रकार…

धक्कादायक! दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधली होती महिला; कोल्हापुरातील प्रकार…

Woman was chained for two months Kolhapur incident : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात आता कोल्हापुरातून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या परिसरात एका महिलेला साखळदंडामध्ये बांधून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या महिलेची सुटका झाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, फोटो व्हायरल

कोल्हापुरातील राजारामपुरी येथील सारिका साळी या 40 वर्षीय महिलेला गेल्या 2 महिन्यांपासून घरामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेले होते. त्या साखळदंडाला 3 कुलूपं देखील लावण्यात आलेले होते. पोलिस जेव्हा या ठिकाणी पोहचले असता त्यांना दोन कुलुपांच्या चाव्या सापडल्या मात्र एक चावी बनवण्यासाठी चावी बनवणाऱ्याला बोलावून या महिलेची सुटका करण्यात आली.

‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप! गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले

दरम्यान या महिलेला असे का बांधून ठेवण्यात आले होते. याबाबत काहीही माहिती नाही. मात्र ही महिला मंतिमंद आहे. रस्त्यावर फिरते. कोणत्याही वस्तू ओढून खाते. त्यामुळे हीला असे बांधून ठेवलेले असू शकते. तर ही महिला तिचा भाऊ, भावजयी आणि भाच्यासोबत राहते. त्यामुळे या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर या महिलेला प्राथमिक उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिस पुढील तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube