उद्धव ठाकरेंकडून कट, कमिशन आणि कसाईचा कार्यक्रम; शेलारांकडून एसआयटीची मागणी

उद्धव ठाकरेंकडून कट, कमिशन आणि कसाईचा कार्यक्रम; शेलारांकडून एसआयटीची मागणी

मुंबई : भाजप (BJP)नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray)संजय राऊतांवर (Sanjay Raut)पत्रकार परिषद घेत जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, आज मी अतिगंभीर विषयाकडं आपलं लक्ष वेधून घेतो, आणि या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)याबद्दल पत्र लिहिलं आहे. जुन्या काळात एक सिनेमा होत पाप की कमाई, पण आता या सगळ्या घटनांचा गोषवारा समोर आहे. विशेषता मुंबई महापालिकेच्या कामांमधील 76 कामांमधील 12 हजार कोटींच्या घोटाळ्यावर महालेखाकारांनी विश्लेषण केलं आहे. त्यावरुन दिसून येतंय की, मुंबईमध्ये काय चाललंय? काय लुटपाट चालू आहे? म्हणून त्याचं विश्लेषण करायचं झालं तर ज्या मुंबईचं नेतृत्व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहेत, करत होते. त्याचं वर्णन एकच करता येईल की कट कमिशन आणि कसाई, अशा शब्दांमध्ये भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

मंत्री सावंतांचा गौप्यस्फोट ! बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने; मी घेतल्या दीडशे बैठका

आशिष शेलार म्हणाले की, कट कसाई आणि कमिशनचा गोरखधंदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नाकासमोर खिसे कापत होता. उद्धव ठाकरेंनी निर्दयीपणाने एखादा कसाई करेल अशा पद्धतीने कारभार केल्याचा आरोप यावेळी शेलारांनी केला आहे. शेलार म्हणाले की, अनेक मुंबईकरांचे जीव गेले, मुंबईकरांच्या खिशावर चाकू फिरवला, मुंबईच्या महापालिकेवर दरोडा टाकला, त्यामुळे कट, कमिशन आणि कसाई असा चित्रपट बनावा अशा पद्धतीनं अशाच पद्धतीचा सगळा परिपाठ रिपोर्टमध्ये दिसत आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

पत्रात त्यांना विनंती केली आहे. की हे ऑडिट प्रकरण 28 नोव्हेंबर 2019 ते 31 ऑक्टोबर 2022 या काळातील कोविडच्या कामांना बाजूला काढलं तर 76 कामांच्या ऑडिटमधून 8 हजार 400 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे याची एसआयटी स्थापन करुन त्याची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, यामध्ये अनेकांचे हात अडकले आहेत.

याच्यामध्ये पहिल्यांदाच रस्ते कसे बनवावे यासाठी मुंबई महापालिकेत एक यलोबुक आहे. तसेच बांधकामासाठी राष्ट्रीय बांधकाम कोड आहे. तसं टेंडरच्याबाबत एक पुस्तकच आदित्य ठाकरेंनी लिहावं इतके घोटाळे असल्याचा आरोप यावेळी आशिष शेलारांनी केला आहे.

तसेच आशिष शेलार म्हणाले की, त्यांनी थर्ड पार्टी ऑडिट केलेले नाही. त्याचबरोबर अटी शर्तींचा भंग केला आहे, तो मान्य आहे. टेंडर फेरफार केला आहे. त्यात टेंडर 4 लोकांना दिल्याचं सांगितलं आहे पण एकाच व्यक्तीला टेंडर दिले आहे. त्याचबरोबर एका अपात्र व्यक्तीला टेंडर दिले आहे, जणूकाही तो जावई आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube