केरळनंतर मुंबईमध्येही पोस्ट ऑफिसचा खास उपक्रम; आयआयटी बॉम्बेमध्ये बनवली ‘जेन झी’ थीम काउंटर
post office ने मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये महाराष्ट्रातील पहिलं जेन झी थीम असणारं पोस्ट ऑफिस बनवलं आहे.
A special initiative by the post office in Mumbai IIT Bombay for new ‘Gen Z’ theme counter set up after Kerala : जेन झी या पीढीचं सर्व काही हटके असतं. ते कपडे असो की, त्यांचा ऑफिसचा डेस्क त्यावरून त्यांचा आणि त्यांच्या अगोदरच्या जनरेशनमधील फरक लगेच कळतो. त्यामुळे त्यांच्या पिढीला जुन्या गोष्टींकडे आकर्षित किंवा त्यांना जुन्या गोष्टींमध्ये रस वाटावा त्यांनी त्या कराव्यात यासाठी नवनवीन कल्पना समोर येत आहेत. असाच एक खास उपक्रम भारतीय टपाल विभागाने केला आहे. या अगोदर असाच उपक्रम केरळमध्ये देखील टपाल विभागाने केला होता. त्यानंतर आता मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये केला आहे. नेमका हा उपक्रम काय? जाणून घ्या…
ब्रेकिंग : अजितदादांचे ‘रमी किंग’ माणिकराव कोकाटेंविरोधात वॉरंट जारी; कोणत्याही क्षणी अटक होणार
पारंपारिक आणि आधुनिकतेचा मेळ साधत भारतीय टपाल विभागाने मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये महाराष्ट्रातील पहिलं जेन झी थीम असणारं पोस्ट ऑफिस बनवलं आहे. त्याचं उद्धाटन 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या ऑफिसची थीम तरूणांना आकर्षित करणारी आहे. ज्यातून त्यांनी पोस्ट दळणवळण आणि संवादाचे जुने आणि टाकाऊ माध्यम न वाटता. ते त्याचा वापर करतील.
दक्षिण कमांडतर्फे माजी सैनिक आणि वीर नारींचा सत्कार करून पुण्यात विजय दिवस 2025 साजरा
महाराष्ट्र आणि गोवा मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी याबाबत माहिती दिली की, भारतीय टपाल विभाग प्रयत्न करत आहे की, जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करणे आणि ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार सेवा दिली जावी. यातूनच मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये महाराष्ट्रातील पहिलं जेन झी थीम असणारं पोस्ट ऑफिस बनवलं आहे. कारण भारतीय टपाल विभागाला मोठा वारसा आणि इतिहास आहे. यातून हा वारसा काळानुरूप बदलून तो पुढे चालवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
माणिकराव कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं? CM फडणवीसांचा अजित पवारांना सवाल
या जेन झी पोस्ट ऑफिसमध्ये खास रंगेबेरंगी थीम असणाऱ्या भिंती, स्लोगन, हॅशटॅश, पार्सल ज्ञान डेस्क, क्युआर आधारित आणि डिजीटल सेवा वितरण, आधार नोंदणी सुविधा आणि पोस्ट ऑफिस बचत बॅंक योजनांसाठी मार्गदर्शन केंद्र यांचा समावेश आहे. ग्राहकांना स्पीड पोस्ट सेवांवर 10 टक्के सूट आणि बल्क पार्सलवर 5 टक्के सूट अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत.
