मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?

  • Written By: Published:
मोठी बातमी : आदित्य ठाकरे, राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी, कुणाच्या मुसक्या आवळणार?

ED Raid In Mumbai Area : राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. मात्र, अद्याप या नावांना ईडीकडून दुजोरा मिळालेला नाही. ईडीच्या या कारवाईदरम्यान नेमक्या कुणाच्या मुसक्या आवळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून, राजकीय वर्तुळात या छापेमारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते युवासेनेचे पदाधिकारीदेखील आहेत. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्याच हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

Yoga Day Celebration: भारत-चीन सीमेजवळील सैनिकांचा योगा, पाहा फोटो

तर. दुसरीकडे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे सुजित पाटकर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून केली आहे. त्यात आता ईडीचीही एन्ट्री झाल्याने अनेक घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

कोणत्या घोटाळ्याचे आरोप आहेत?

कोरोनाच्या काळात मुंबईत अनेक कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यातील मुंबईतील दहिसर येथे एक कोविड सेंटर उभारण्यात आले होते. खासदार संजय राऊत यांचे अगदी जवळचे उद्योगपती सुजित पाटकर यांनी हे कोविड सेंटर बांधले होते, त्यासाठी पाटकर यांनी रातोरात कंपनी स्थापन केल्याचा आरोप आहे. याला लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस असे नाव देण्यात आले होते. सुजित पाटकर यांना याचे कंत्राट मिळाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube