Ashadhi Wari : एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला; वारकऱ्यांसाठी शासन आदेश जारी
Ashadhi Wari Toll Free : विठूरायाच्या भेटीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. वारकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. आज त्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसांमार्फत स्टिकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी प्रशासनाकडून एक स्टिकर्स देण्यात येणार आहे. आजपासून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौकी व आर.टी.ओ. ऑफिसमध्ये हे पास उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन येतेवेळी 13 जून ते 3 जुलै या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठी असेल, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज खरे ठरलेत का?
वाकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील जादा बसेत सोडण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई, पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते/महामार्गावर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करावी. तसेच गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनास आवश्यक असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यभरातून पंढरपुरला जाणारे रस्ते मुंबईमधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे मार्ग तसेच जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या आणि दुरुस्ती करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.