मीरा रोडवर सनातन यात्रेवर हल्ला, फडणवीसांनी घेतली दखल; म्हणाले, ‘सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास…’
Devendra Fadnavis on sanatan yatra attack : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभर शोभायात्रा काढल्या गेल्या. मात्र, प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मुंबईजवळील मीरा रोड येथे सनातनची यात्रा काढण्यात आली होती. मात्र, या यात्रेवेळी मोठा गोंधळ झाला होता. काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन यात्रेत सहभागी वाहनांवर हल्ला केला होता. या घटनेची दखल आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Saif Ali Khan: सैफ अली खान रुग्णालयात दाखल! नेमकं कारण काय? चाहत्यांना धक्का
देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत लिहिलं की, मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2024
टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींमधून विराटची माघार, काय आहे कारण?
नेमकं काय झालं?
सनातन यात्रेशी संबंधित लोकांच्या आरोपानुसार, मुंबईतील भाईंदरमध्ये सनातन धर्म यात्रेदरम्यान रामभक्त राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन घोषणा देत होते. अशातच काही समाजकंटकांनी यात्रेतील वाहनांवर काठ्यांनी हल्ला केला. धार्मिक झेंडेही फाडले, शिवाय वाहनांचीही तोडफोड केली. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले होते. अद्यापही परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मीरा रोडवर घडलेल्या घटनेचे व्हिडिओही व्हायरल झालेत. तोडफोड करणाऱ्यांनी अल्ला हु अकबरच्या घोषणा दिल्याचंही बोलल्या जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही घटना 21 जानेवारीच्या मध्यरात्री 12 नंतर घडली.
तर आमदार प्रताप सरनाईक यांनीही या घटनेवर भाष्य केलं. मिरारोड येथे झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता तात्काळ एस.आय.टी. स्थापन करून या प्रकरणी दोषी असलेल्या सर्व आरोपींवर पुढील ४८ तासांत कठोर कारवाई करावी, अन्यथा शांततामय मार्गाने मिरा-भाईंदर शहर बंदची हाक द्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.