उषा प्रवीण गांधी कॉलेजमध्ये बाजार ई यूपीजीला सुरुवात, विद्यार्थी बनले व्यावसायिक

Usha Praveen Gandhi College: व्यावसायिक ज्ञान मिळवणे, व्यवसाय कसा करायचा ? तो कसा वाढवायचा त्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे या बाजारा एयुपीजीत मिळतं असते.

  • Written By: Published:
Bazara AUPG Starts At Usha Praveen Gandhi College, Students Become Professionals

BAZAAR-E- UPG starts at Usha Praveen Gandhi College, students become professionals मुंबईः कॉलेज जीवनात शिक्षण घेत असताना व्यवसाय ज्ञान प्रत्यक्षपणाने अनुभवण्याच्या उद्देशाने श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे बाजार ई यूपीजीला आज सुरुवात झाली आहे. प्राचार्य डॉ. अंजू कपूर यांच्या हस्ते *बाजार ई युपीजीचे उद्घाटन झाले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. स्मृती नानावटी, रजिस्टार कलिका खेर्डिकर, प्रोफेसर डॉ. अभिजित मोहिते आणि शुभांगी नरगुंडं यावेळी उपस्थित होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, व्यावसायिक ज्ञान मिळवणे, व्यवसाय कसा करायचा ? तो कसा वाढवायचा त्यासाठी काय करावे लागते ? या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे या बाजार ई युपीजीत मिळतं असते. या बाजाराला 2014 पासून सुरवात झाली आहे. हे यंदाचे 11 वे वर्ष आहे.

मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास प्राचार्य डॉ. अंजु कपूर यांच्या हस्ते फीत कापून बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले 30 स्टॉल पाहिले मिळाले. वस्तू विक्री करणारे विद्यार्थी आणि खरेदी करणारे विद्यार्थी अशा प्रकारचे चित्र या परिसरात सकाळपासून पाहायला मिळत होते. खाण्यापासून ते जीवनात उपयोगी पडणाऱ्या सर्व गोष्टी या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी आणि बुधवारी असा दोन दिवस हा बाजार सुरु असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube