मोठी बातमी : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!

मोठी बातमी : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!

pradeep Sharma : मुंबई हायकोर्टाने माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (pradeep Sharma)यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी निर्णय दिला आहे. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court)एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे.

Thalapathy Vijay: अभिनेता थलपथी विजयच्या गाडीवर दगडफेक, व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणात 8 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. तर 11 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. त्याचबरोबर 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाकडून 13 इतर आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती. आता मात्र मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि त्यांना दोषी ठरवले आहे. एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील आरोपी आहेत.

न्यायालयाचा निकाल नेमका काय?
लखन भैय्या एनकाउंटर प्रकरणात माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच शर्मा यांना तीन आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात न्यायालयाने 8 पैकी 6 खाजगी व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली असून, कनिष्ठ न्यायालयाने 13 पोलीस अधिकाऱ्यांची शिक्षा कायम ठेवली आहे.

पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सरताप, दिलीप पालांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश हरपुडे, आनंद पाताडे यांच्यासह रत्नाकर कांबळे, तानाजी देसाई, हलकी पायरी, पांडुरंग कोकम, संदीप सरदार, देविदास सकपाळ, विनायक शिंदे आदींचे अपील न्यायालयाने फेटाळून लावले आहे. तर, अखिल खान, खंबारी, मनोज राज, सुनील सोळंकी, मोहम्मद शेख, सुरेश शेट्टी या खासगी व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
झालं असं की, 2006 मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटरची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीमध्ये समोर आलं. लखन भैया याचं खरं नाव रामनारायण गुप्ता असं होतं. त्याच्याविरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर 2006 मध्ये मुंबई पोलिसांच्या पथकानं छोटा राजन टोळीचा सदस्य असल्याच्या संशायवरुन त्याला त्याला ताब्यात घेतलं. त्याच रात्री लखन भैय्याचा पश्चिम मुंबईतील वर्सोव्यामध्ये चकमकीत मृत्यू झाला. या कथित बनावट चकमकीचं नेतृत्व प्रदीप शर्मा हे करत होते.

त्यानंतर रामनारायणचे बंधू वकील आहेत. त्या अॅड. रामनारायण गुप्ता यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसआयटी चौकशी करण्यात आली अन् खटला दाखल करण्यात आला. पुढे या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने 2013 मध्ये 11 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली मात्र प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवले.

प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर अॅड. रामप्रसाद गुप्ता यांच्यासह राज्य सरकारकडूनदेखील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. आणि त्या दोषी ठरवलेल्या पोलिसांनी आपल्याला सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध अपील केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज