वक्फ बोर्ड विधेयकाला ठाकरेंचा विरोध; भगदाड पाडण्यासाठी भाजपकडून मंगळवारचा मुहूर्त जाहीर

वक्फ बोर्ड विधेयकाला ठाकरेंचा विरोध; भगदाड पाडण्यासाठी भाजपकडून मंगळवारचा मुहूर्त जाहीर

Chandrashekhar Bawankule Criticize Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वक्फ (Wakf) बोर्ड सुधारणा विधेयकाला काल विरोध करण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) कोणतीच भूमिका स्पष्ट घेतली नव्हती. मात्र, रात्री उशिरा लोकसभेत झालेल्या मतदानात ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात मतदान करण्यात आलं. यावरून मात्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे विचार सोडले आहेत. विशिष्ट मतांवर डोळा ठेवत त्यांनी हे मतदान केलंय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत काँग्रेसचे (Congress) विचार उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्याचा आणखी एक पुरावा जनतेसमोर ठेवला आहे. एका विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवत हे विरोधी मतदान केले (Maharashtra Politics) आहे. आज शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत शिवसैनिक आहेत. अनेक लोक पक्ष सोडणार आहेत, मंगळवारी मी पक्षप्रवेश घेतला असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय.

दिशा सालियन प्रकरणात ट्विस्ट, दिशाच्या लॅपटॉपमधून धक्कादायक माहिती; व्हॉट्सअप डेटा कुणाचा?

ठाकरेंनी केलेले मतदान हे देशाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. जनता त्यांना माफ करणार नाही, जे खासदार निवडून दिले, तिथे लोकांना वाटेल ही चूक झाली. जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही, असा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलाय.

वीज दर जैसे थे…जुनेच दर लागू राहणार, राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात. राहुल गांधींना खुश करण्यासाठी ते बोलत आहेत. तर एखाद्या व्यक्तीला पंडू रोग होतो, मग तो काहीही बडबड करतो, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलीय. भाजप आणि मोदींचे नाव घेतले की, त्यांना विस्मृती होते असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय.

तर वक्फचा विचार बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून होतोय. चुकीच्या नोंदी झाल्या आहेत, त्यावर शासनाला काम करता येईल. चुकीच्या नोंदणी दुरुस्त होतील. हिंदूंच्या जमिनी आहेत. अल्पसंख्याक आणि देवस्थानच्या जमिनी आहेत. सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे. सर्व कायदेशीर होणार आहे. अतिक्रमण आणि मोघलशाही वक्फ बोर्डाकडून झाली, ती दुरुस्ती होईल असं देखील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube