पक्षवाढीसाठी अजितदादांची मोहीम : सुरुवात मात्र भाजपलाच सुरुंग लावून करणार!

पक्षवाढीसाठी अजितदादांची मोहीम : सुरुवात मात्र भाजपलाच सुरुंग लावून करणार!

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीत (NCP) बंड झालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) 35 ते 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. तर शरद पवारांकडे (Sharad Pawar) अवघे 14 ते 18 आमदार शिल्लक राहिले. या पार्श्वभूमीवर पवार पक्षविस्तारासाठी बाहेर पडले आहेत. शनिवारी (8 जुलै) त्यांची येवला येथे जाहीर सभा पार पडली. त्यानंतर ते उर्वरित महाराष्ट्रातही सभा घेणार असल्याचे सांगितलं जातं आहे. (DCM Ajit Pawar trying to contact to those mla who left ncp and join bjp in last 10 years)

दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनीही पक्षविस्ताराचे धोरण आखले आहे. यात ते नवीन चेहरे तर शोधत आहेतच पण याशिवाय गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून वेगवेगळ्या कारणांमुळे भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती आहे. यात अनेक बड्या-बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

शिंदेंची उपयुक्तता संपली; मुख्यमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागेल! पृ्थ्वीराज चव्हाणांचा दावा

२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजप युतीची सत्ता २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता येईल, या आशेने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र, ऐनवेळी राजकीय गणिते बदलली आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आमदारकी मिळाली, पण सत्ता नाही, अशी गत या आमदारांची झाली होती.

तुमच्या बुडाखाली अंधार बघा, बावनकुळे महाविकास आघाडीवर बरसले !

मात्र अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरंग लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत आले. त्यामुळे भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेकांचा मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पवार यांच्या गटाने भाजपबरोबर सत्तेत सामील होत, अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे भाजपमध्ये दाखल झालेले अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा आहे. यामुळेच पुढील काळात हे नेते आपल्यासोबत आले तर फायदा होऊ शकतो असे आडाखे बांधत पक्षविस्तारासाठी पवार हे संपर्क करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले प्रमुख नेत्यांमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, चित्रा वाघ, मधूकर पिचड, वैभव पिचड यांच्या नावाच समावेश आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याशी सुरुवातीपासूनच आमचे संबंध उत्तम आहेत, त्यामध्ये कधीही खंड पडला नसल्याचे मत या आमदारांनी एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube