देशाचं सरकार माझ्या दिव्यांगत्वाला…; दिव्यांग तरुणीच्या पोस्टवर फडणवीसांची दिलगिरी

  • Written By: Published:
devendra fadnavis apologizes

मुंबई : देशात विविध शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकठिकाणी दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही सोय़ीसुविधा नाहीत. याचीच प्रचिती मुंबई विवाह रजिस्ट्रार ऑफीसमध्ये (Mumbai Marriage Registrar Office) आली. लग्नाच्या नोंदणी रजिस्टर कार्यालयात गेलेल्या एका दिव्यांग तरुणीला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी व्हीलचेअरवरून उचलून न्यावे लागले. यामुळे तरुणीने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तरुणीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) या तरुणीची मुलीची माफी मागितली (Virali Modi)

Sujay Vikhe : एकमेकांचं कॉपी नको, नवं काहीतरी करू… देवदर्शनावरून विखेंचा लंकेंना टोला 

विराली मोदी नावाच्या तरुणीचा १६ ऑक्टोबरला विवाह झाला. यासाठी ती लग्नाच्या नोंदणी रजिस्टर कार्यालयात गेली होती. तिथला तिच्यासोबत घडलेला प्रसंग विराली मांडली. आपला अनुभव कथन करतांना विरालीने सोशल मीडियावर लिहीलं की, मी खार परिसरातील रजिस्ट्रार कार्यालयात विवाह नोंदणीसाठी गेले होते. मात्र तिथं कोणीही आपल्या मदतीसाठी पुढे आले नाही. ऑफीस दुसऱ्या मजल्यावर होतं. तिथं लिफ्टही नव्हती.

तिने पुढं लिहिलं की, संबंधित अधिकारी माझी स्वाक्षरी घेण्यासाठी खाली यायला तयार नव्हते. त्यामुळं मला लग्नासाठी उचलून न्यावं लागलं. जर मला वरच्या मजल्यावर जातांना काही दुखापत झाली असती तर? त्यासाठी जबाबदार कोण? असा सवाल तिने केला. माझ्या देशाचं सरकार आणि नागरिक माझ्या दिव्यांगत्वाला सामावून घेऊ शकत नाही, याचं मला दु:ख झालंय, अशी पोस्ट विरालीने बुधवारी लिहिली होती.

विरालाची हा अनुभव वाचून अनेकांना आपला संताप व्यक्त केला. तर अनेकांनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. ही पोस्ट वाचल्यानंतर फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, सर्वप्रथम नवीन शुभारंभाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा. तसेच तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या घेतली दखल असून याबाबत मी सुधारणा करून योग्य कारवाई करीन, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube