ED Raid : मढ आयलंडला फ्लॅट, 15 कोटींची FD; IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची संपती पाहून अधिकारी झाले हैराण

ED Raid : मढ आयलंडला फ्लॅट, 15 कोटींची FD; IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची संपती पाहून अधिकारी झाले हैराण

ED Raid On Sanjeev Jaiswal :  कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने बुधवारी (२१ जून ) मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले, जे गुरुवारपर्यंत सुरू राहिले. या छाप्यात तपास यंत्रणेला 150 कोटींहून अधिक किमतीच्या 50 मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. या मालमत्तांशिवाय अन्य अनेक ठिकाणी केलेल्या १५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीने संशयिताकडून अनेक एफडी आणि 2.46 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. यासह 68.65 लाखांची रोकडही सापडली आहे.

आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला. तपासादरम्यान, ईडीला कळले की संजीव जयस्वाल यांच्या पत्नीकडे   24 मालमत्ता आहेत. आयएएसच्या पत्नीच्या नावावर मढ बेटावर अर्धा एकर भूखंडही सापडला आहे. याशिवाय अनेक फ्लॅट्सही आले आहेत. मालमत्तेची किंमत 34 कोटी रुपये आहे. याशिवाय आयएएसच्या पत्नीच्या नावे 15 कोटी रुपयांची एफडीही ईडीला सापडली आहे. संजीव जयस्वाल यांच्या पत्नीकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून तब्बल ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले.

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

ईडीकडून गुरुवारी जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी ईडीने ५० कोटी रुपयांच्या मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे जप्त केली. याशिवाय, ईडीच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांवेळी ६८.६ लाखांची रोकड, २.४६ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जयस्वाल यांनी त्यांच्या मालमत्तेची एकूण किंमत 34 कोटी रुपये असल्याचे सांगितले आणि त्यांनी सांगितले की भूखंड आणि मुदत ठेवींसह बहुतेक मालमत्ता त्यांच्या पत्नीला त्यांचे वडील, सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी, आई आणि आजी-आजोबा यांनी भेट म्हणून दिल्या होत्या. याआधी आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलावले असतानाही ते गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत.

प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकणाऱ्या भुजबळांचा यू टर्न; म्हणाले, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची…

आणखी कुणावर छापे टाकले

‘मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसस’ला देण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या कंत्राटात गोंधळ झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने यातील भागीदार डॉ. हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा व राजू साळुंखे तसेच युवा सेनेचे (ठाकरे गट) सचिव सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी बुधवार, २१ जूनला छापे टाकले. या कंत्राट वाटपाशी निगडित कथित घोटाळ्यात बृहन्मुंबई महापालिकेच्या त्यावेळच्या उच्चाधिकाऱ्यांचाही संबंध असल्याचे ‘ईडी’ला दिसून येत आहे. त्यामुळेच ‘ईडी’ने महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त व वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरीही शोधमोहीम राबवली.

काय आहे बीएमसी घोटाळा

बीएमसीने एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या दरात बॉडी बॅग खरेदी केल्या होत्या.  2020 मध्ये प्रति बॅग 6,800 रुपये आणि 2021 मध्ये 600 रुपये अशी त्याची किंमत लावण्यात आली. ईडीच्या एका सूत्राने सांगितले की, त्याच कंपनीने बॉडी बॅगचा पुरवठा केला होता. इतरांना प्रति व्यक्ती 2,000 रुपये त्याची किंमत होती  परंतु बीएमसीने 6,800 रुपये दिले. तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट देण्यात आले होते. ईडी अधिकाऱ्यांना असेही आढळून आले की बीएमसीने खुल्या बाजारापेक्षा 25-30% जास्त दराने औषधे खरेदी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube