एकनाथ शिंदे दिल्लीत, गोंधळ उडाला गल्लीत; महाराष्ट्राच्या राजकाराणत नवा ट्विस्ट

एकनाथ शिंदे दिल्लीत, गोंधळ उडाला गल्लीत; महाराष्ट्राच्या राजकाराणत नवा ट्विस्ट

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सहकुटूंब दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे राज्यात काही वेगळ्या घडामोडी घडणार आहेत का? अशा चर्चांना पेव फुटले आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत गेल्यानंतर राज्यात काहीना काही घडमोड घडते हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसांनिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आणि गोंधळ गल्लीत अशी काहीसी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटूंब दिल्लीत भेट घेतली त्यावेळी इकडे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते. मुख्यमंत्र्यांची ही भेट निरोपाची भेट आहे का? अशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेले ट्वीट आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले बॅनर. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….. लवकरच अजितपर्व’

पण मिटकरी यांच्या या ट्विटला शिंदे गटाकडून देखील उत्तर आले. नरेश म्हस्के म्हणाले की ‘मिटकरी दमानं, सरकार काम करतंय जोमानं, बंद करा मिटकरी मिठाचा खडा टाकणं…. सरकार करतंय काम भारी… ट्रिपल इंजिनची शक्ती न्यारी… विकास कामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग आडवणं मिटकरी दमानं.’

ठाकरे गटापुढं लवकरच The End चा बोर्ड; शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा

मिटकरी यांचे ट्विट टाकण्याचे टायमिंग अचून होतं. शिंदे दिल्लीत होते आणि अजित पवार यांचा वाढदिवस होता. त्यामुळे अजित पवारांना जन्मदिनीचं मुख्यमंत्री होण्याचे गिफ्ट मिळतंय की काय अशी चर्चा रंगली.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की सध्या ते स्वप्न पाहात आहेत भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. परंतु एखाद्या नेत्यांबद्दल केलेले वक्तव्य जास्त गंभीरपणे घेण्याची गरज नाही. त्यांच्या बॅनरमुळे कोणी डिवचले जातंय असे समजण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

ठाकरे गटापुढं लवकरच The End चा बोर्ड; शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा

अतिउत्साही कार्यकर्ते असतात ते असे बॅनर लावतात. बॅनरने काही फरक पडत नाही, असे भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.एनडीएची सदिच्छा भेट होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube