आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये ICU मधून करु नयेत : संजय राऊत
Sanjay Raut replies Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पक्षाने आज त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत. तसेच विधानसभेनंतर ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाणार आहे. दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगत आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये आयसीयूमधून करू नयेत असे संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्वात आधी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. ते या राज्याचे नेते आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य मला कुणीतरी सांगितलं. पण ते सत्यावर आधारीत नाही. कारण कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कुणीही हात लावणार नाही.
आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्यं आयसीयूमधून करू नयेत. त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी. ते आता आयसीयूत आहेत. तेव्हा छातीवर ताण येईल अशी वक्तव्यं त्यांनी आयसीयूमधून करू नयेत. या प्रकरणात त्यांनी आधी प्रकृती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
मोदींनी नेमलेला सुभेदार महाराष्ट्र लुटतोय
ज्या मुख्यमंत्र्यांची सुभेदार म्हणून बेकायदेशीर नेमणूक मोदींनी केली तो मोदींनी नेमलेला सुभेदार महाराष्ट्र लुटतो आहे त्यामुळे मोदी खुश होतात, मोदींचे ते स्वप्नच आहे. फडणवीसांची सुरक्षा अचानक वाढवली राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा त्यांनी स्वतःच वाढवली. राज्याचे गृहमंत्री स्वतःच सुरक्षित नाहीत, महाराष्ट्राला चिंता वाटते. राज्यात कायदा व सुव्यवस्था नाही. देवाभाऊंना नेमका कोणापासून धोका आहे ? मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का ? पुढील पंधरा दिवसांत महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा संघर्ष पहायला मिळेल. ज्यांना आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नव्हती त्यांच्यापासून धोका आहे का ? राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत खुलासा करायला हवा असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांकडून रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी; भाजप आमदार नितेश राणेंकडून जोरदार पलटवार