यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन नागरिकांचे स्थालांतर

यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करुन नागरिकांचे स्थालांतर

Yavatmal News : यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामध्ये घराची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील आनंदनगर तांडा गावात पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते.

जिह्यातील पाच ठिकाणी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. या पथकांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेले आहे. दरम्यान रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मृतांची संख्या 26 वर गेली असून 82 जण बेपत्ता आहेत. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. हवामान खात्याने पालघरमध्ये अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, गुजरात, गोव्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महादेव जानकार थेट मिर्झापूरमधून उतरणार लोकसभेच्या मैदानात; PM मोदींच्या मंत्र्याला देणार आव्हान!

राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट
पालघरसह मुंबई उपनगरी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पालघरमध्ये गेल्या 24 तासांत पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube