हलाल-झटका वादात आव्हाडांची फोडणी; मटण कापायला मल्हार नावं कुठून आलं ते अनेकांचं कुलदैवत

Jitendra Awhad on mutton Halal Zataka Cotervercy : राज्यात सध्या विविध मुद्यावरून राजकारण तापलेलं असताना आता यामध्ये मटण कापण्याच्या पद्धतीवरून देखील वादंग उठलं आहे. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी मटण कापण्याच्या हलाल आणि झटका या पद्धतींमधील मुस्लिम धर्मात मान्यता असलेल्या हलाल पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी हिंदुंनी झटका पद्धतीने कापलेले मटण खावे असं अवाहन केलं आहे. त्यात आता मटण विकणाऱ्या दुकाणदारांसाठी मल्हार हे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मटण कापायला मल्हार नावं कुठून आलं ते अनेकांचं कुलदैवत असं म्हणत या वादात आणखी फोडणी घातली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मटणावर वाद होऊ शकत नाही. हिंदू मुस्लिमचा स्पर्श या वादाला करणे म्हणजे ठिणगी पेटवणे आहे. हलाल हा शब्द काढला तर याचा अर्थ सायंटिफिक आणि लीगल असा आहे. खाटीक समाजात एक पद्धत असते या पद्धतीने मटण कापलं जातं. मल्हार हे नावं कुठून आला. मल्हारी मार्तंड तुम्ही अरे तुरे करणार. ते अनेकांचे कुलदैवत मल्हारी मार्तंड आहे.याचा प्रयोजन हिंदू मुसलमान वाद निर्माण करणे हा आहे. उद्या असे होईल की मुसलमानांचा कुर्ता शेरवानी घालू नका म्हणतील. माझ आव्हान आहे कीं खाटीक झटका मटण करतात. माझ्या मते ठाण्यामध्ये एक दुकान आहे ते शीख समुदायासाठी आहे. तेथे हलाल शब्द वापरत नाही.
तसेच यावेळी आव्हाड राणेंच्या कार्यकर्त्याने मुस्लिम व्यक्तीला केलेल्या मारहाणीवर बोलले. ते म्हणाले की, हे धार्मिक तेढातून झाला असेल पण बाकीच्या मारहाण या अशा झाल्या नाही त्या खंडीतून झाल्या. मारहाण या आता महाराष्ट्रासाठी नव्या राहिला नाही. माळशिरस असू द्या लातूर असू द्या कणकवली असू द्या मारहाणीचे प्रकरण होतच आहेत. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. तसेच यावेळी त्यांना विचारले असता की, सभागृहात आवाज का उठवला जात नाही. त्यावर ते म्हणाले की, सभागृहात आम्हाला बोलू तर दिले पाहिजे 240 विरुद्ध 40 आहोत. आतमध्ये बोलू दिले जात नाही म्हणून आम्ही बाहेर बोलतो. विरोधक म्हणून आम्ही बोलत राहतोय.