शिंदेंना पुण्यात दुसऱ्यांदा लॉटरी! धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला, ठाकरेंची साथ सोडली

शिंदेंना पुण्यात दुसऱ्यांदा लॉटरी! धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला, ठाकरेंची साथ सोडली

Sulabha Ubale Joins Eknath Shinde Group : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं मिशन टायगर (Mission Tiger)सध्या जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागल्याचं समोर आलंय. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत.

ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलंय. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे शिंदेसेनेत मोठं (Pune Politics) आनंदाचं वातावरण आहे. तर पक्षाला मोठी गळती लागल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे.

एअरटेलची एलन मस्कच्या कंपनीसोबत हातमिळवणी! शेअर्सच्या किमतीत वाढ, गुंतवणूक करण्याची योग्य वेळ?

शहरातील तीनही मतदार संघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात पक्षाचं अस्तित्वचं शिल्लक नाही, पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष (Shivsena Uddhav Thackeray) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार आहे, असं ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी म्हटलंय.

सुलभा उबाळे यांची राजकीय कारकीर्द आपण जाणून घेऊ या. त्यांनी 1992 शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्या 1997 साली नगरसेवक झाल्या. उबाळे यांनी 1998 साली विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं. उबाळे 1999 उपसभापती आणि 2001 अ प्रभाग समिती, तर 2007 ते 2012 शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य राहिल्या. त्यांचा 2009 साली भोसरी विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1272 मतांनी पराभव झाला होता.

‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं

सुलभा उबाळे यांनी 2014 ते 2017 गटनेता म्हणून काम पाहिलं. 2014 मध्ये त्यांना पुन्हा भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली. यावेळी त्यांचा केवळ 15, 641 मतांनी पराभव झाला होता. त्या शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका देखील होत्या. त्यांनी शिवसेना शहर संघटिका पिंपरी चिंचवड म्हणून 5 वर्ष काम पाहिलं. जिल्हा संघटिका म्हणून 2017 ते आजतगायत कार्यरत होत्या. पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या त्या अध्यक्षा देखील आहेत.

Pune Politics : एकनाथ शिंदे यांचं मिशन टायगर सध्या जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube