फडणवीसांनी नाही विश्वासघात ठाकरेंनीच केला; मातोश्री भेटीवरून शंकराचार्य-महंतांमध्ये मतभेद

फडणवीसांनी नाही विश्वासघात ठाकरेंनीच केला; मातोश्री भेटीवरून शंकराचार्य-महंतांमध्ये मतभेद

Mahant Narayangiri Statment on Fadanvis Thackeray Shankrachary meet : ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (Shankaracharya of Jyotirmath) यांनी सोमवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या मातोश्री या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि भाजप-शिंदेंविरोधात मोठं विधान केलं. ठाकरेंचा विश्वासघात झाल्याचं ते म्हणाले होते. त्यावर आता महंत नारायणगिरी यांनी टीका केली आहे.

खेळाडूंना अंतिम इशारा, तीन महिन्यातून एकदा टेस्ट; पाकिस्तान क्रिकेटचा नवा प्लॅन तयार

महंत नारायणगिरी म्हणाले की, शंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते शक्यतो साधारण व्यक्तींकडे ते जात नाहीत. मात्र अंबानींच्या विवाह सोहळ्यात आल्यानंतर त्यांनी ठाकरेंना भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाजपाने उद्धव ठाकरेंना धोका दिल्याचे म्हटलं. मात्र भाजपने नाही तर उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला आहे. 2019 ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते .पण उद्धव ठाकरे यांनीच त्यांना धोका दिला. अशी टीका महंत नारायणगिरी यांनी केली.

भारतीय टपाल विभागात मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी

त्याचबरोबर ते असं देखील म्हटले की आम्ही शंकराचार्यांचा आदर करतो. मात्र जय आणि पराजय हे सांगणं आमचं काम नाही ते जनतेचा आहे आमचं काम पूजा पाठ करण्याचा आहे त्यामुळे कुणाला धोकेबाज कुणाला विश्वास घातकी म्हणणं अशी विधानं विचार करून दिली पाहिजेत. असं देखील यावेळी महंत नारायणगिरी यांनी म्हटलं. त्यामुळे आता शंकराचार्यांच्या मातोश्री भेटीवरून शंकराचार्य-महंतांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

काय म्हणाले होते शंकराचार्य?

यावेळी बोलताना शंकराचार्य म्हणाले की, आपण सर्वजण हिंदू सनातन धर्माचे पालन करणार आहोत. आपल्याकडे पाप पुण्य या संकल्पना आहेत. ज्यामध्ये विश्वासघात हे सगळ्यात मोठं पाप आहे. जो उद्धव ठाकरे यांच्या सोबत झाला आहे. तसेच त्यांना दुःख वाटत आहे. याच दरम्यान त्यांनी मला आमंत्रित केलं. मी देखील त्यांच्या सोबत झालेल्या विश्वासघाताच्या दुःखामध्ये सामील असल्याचं त्यांना सांगितलं.

त्यामुळे जोपर्यंत ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसत नाही तोपर्यंत आम्हाला वाटणारं हे दुःख कमी होणार नाही. त्यावर ते म्हणाले की, तुमच्या जसा आशीर्वाद आहे. तसंच आम्ही प्रयत्न करू. तसेच हिंदुत्व बाबत बोलायचं झालं तर कुणाचा हिंदुत्व खरं आहे हे पाहावं लागेल? कारण जो विश्वासघात करेल तो हिंदू असू शकत नाही. मात्र जो विश्वासघात सहन करेल तो हिंदूच असेल उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेच्या देखील मनात आहे तेच निवडणुकीत दिसला आहे. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच जनादेशाचा आदर करून सरकार बरखास्त करणे योग्य नाही. असं म्हणत शंकराचार्यांनी ठाकरेंच्या समर्थनार्थ मोठं विधान केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube