खेळाडूंना अंतिम इशारा, तीन महिन्यातून एकदा टेस्ट; पाकिस्तान क्रिकेटचा नवा प्लॅन तयार

Pakistan Cricket : टी 20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket) कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी एक आदेश दिला आहे. त्यानुसार आता प्रत्येक खेळाडूची तीन महिन्यातून एकदा फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केले तर कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
टी 20 विश्वचषकातील खराब (T20 World Cup) कामगिरीनंतर हा आदेश देण्यात आला आहे. संघाचे हेड कोच गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि जेसन गिलेस्पी संघ निवडीत सहभागी असतील. दोन्ही कोच पूर्णपणे सक्षम आहेत. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. या दोघांना मोकळीक देण्यात आली आहे. आता दोन्ही प्रशिक्षक चांगले परिणाम देतील याची खात्री आहे, असे नक्वी यावेळी म्हणाले.
झिम्बाब्वेचा पराभव पण धक्का पाकिस्तानला; टीम इंडियाने बनवलं खास रेकॉर्ड
टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाला आधी यूएसए नंतर भारताने पराभूत केले होते. या पराभवांमुळे पाकिस्तानला सुपर 8 मध्येही पोहोचता आले नव्हते. साखळी फेरीतच संघ बाद झाला होता. या अपयशानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर त्यांच्यात देशात प्रचंड टीका झाली होती. संघातून काही खेळाडूंना बाहेर करण्याची मागणी करण्यात आली होती. माजी क्रिकेटपटूंनीही या निराशाजनक प्रदर्शनावर जोरदार टीका केली होती.
या प्रदर्शनानंतर कठोर कारवाई करण्याचा संकत क्रिकेट बोर्डाने आधीच दिले होते. त्यानुसार आता कठोर निर्णय घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. आता संघातील खेळाडू गटबाजी आणि आपसांतील वाद बाजूला ठेऊन कितपत साथ देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? शक्यता नाहीच, बीसीसीआयने दिले दोन पर्याय
पाकिस्तानात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धांची तयारी सुरू केली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून मैदानांची दुरुस्ती करण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. यावर कामही सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहेत. या गटात न्यूझीलंड, बांग्लादेशही आहे. ग्रुप बीमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ आहेत.