मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करत आहे. दरम्यान सुप्रीम […]
मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre)आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve)यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Viral Video) केल्याप्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना धक्का बसला आहे. कारण आदित्यचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे (Sainath Durge)यांना दहिसर पोलिसांकडून […]
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यात आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने बैठक देखील घेतली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आजपासून राज्य सरकारचे तब्बल 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहे. यामुळे […]
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या बदनामीकारक व्हिडीओ बद्दल राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यात महिला लोकप्रतिनिधींना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचे प्रकार वाढत आहेत. जर लोकप्रतिनिधींबाबत असे प्रकार होत असतील तर राज्यात महिला सुरक्षित आहेत का, असा […]
मुंबई : अर्थसंकल्पीय भाषण करत असताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील मुद्दा क्रमांक १२६ मानसिक अस्वास्थ व व्यवसनाधिनता दूर करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याबाबत आहे. तसेच १६५ वा मुद्दा हा स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारका विषयीचा आहे. अर्थसंकल्पाची प्रकाशने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतात. मात्र अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पअलावर ठेवण्यात येत नाही त्यामुळे त्याबाबतचा खुलासा सरकारने करण्याची […]
मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]