कल्याण : देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) जेव्हा मांडला जातो. तेव्हा तो देशाकरता मांडला जातो. अर्थसंकल्पावर बोलण्या इतपत आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांना अर्थसंकल्प समजत नाही, अशी टिका करत भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात मुंबई आणि एमएमआर परीघामध्ये ३१४ किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण करायला प्रारंभ केला. […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा यंदा रविवारी (ता. 5) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन नगर रायझिंग फाउंडेशनने केले आहे. या स्पर्धेसाठी अडीच हजार धावकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती नगर रायझिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप […]
अहमदनगर : नगर रायझिंग फाउंडेशन तर्फे रविवारी (ता. 5) नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धा अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज (गुरुवारी) काढले. या कालावधीत पाथर्डी- अहमदनगर अशी ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात महावितरणकडून शनिवारी 4 फेब्रुवारीला महत्त्वाच्या यांत्रिक दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठा तीन दिवस विस्कळीत राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली. महावितरण कंपनीकडून मुळा धरण परिसरातील फिडर दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी […]
पुणे : कसबा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजपकडून जोरदार तयारी सुरु असतानाच कुणाल टिळक यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आलंय. कसब्यातून उमेदवारीसाठी अनेकांनी इच्छा दर्शवली आहे. भाजपकडून पुण्यातील एकूण पाच जणांची प्रवक्तेपदी निवड केल्याने कोणाला […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. मात्र ही फेर मतमोजणीची मागणी डॉ. रणजीत पाटील यांच्या अंगाशी आल्याचं पाहायाला मिळत आहे. कारण त्यामुळे 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली […]