आपल्या वाक्-चातुर्याला तोड नाही; जाधवांकडून कौतुक होताच फडणवीसांकडून केकची ऑफर
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विरोधकांनी विविद मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले आहे. त्यामध्ये आज ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. सभागृहामध्ये अनेकदा हात वर करून देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर भास्कर जाधवांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. त्यावरून भास्कर जाधव आणि फडणवीसांमध्ये प्रश्नांवरून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. (Bhaskar Jadhav VS Devendra Fadanvis in Maharashtra Monsoon Assembly Session )
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
काय म्हणाले भास्कर जाधव?
सभागृहामध्ये अनेकदा हात वर करून देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर भास्कर जाधवांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं असता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी भास्कर जाधवांना बोलण्याची संधी दिली असता ते म्हणाले की, फडणवीसांना माझ्या भावना कळाल्या धन्यावाद. पण ते बोलण्यात चतुर आहेत. गेल्यावेळी आठ ते दहा लक्षवेधी लागायच्या पण यावेळी माझ्या दोन तरू लक्षवेधी लावा. मी अध्यक्षांकडे यासंदर्भात नेहमी जातो. त्यांचं माझं काही वाकड नाही. मी त्यांच्याकडे जातो. चहा देखील पिऊन येतो. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना मी त्यांचा प्रचार देखील केला होता. पण फडणवीसांनी त्यांना खासगीत काही सांगून ठेवले आहे का? म्हणून मला बोलण्याची संधी मिळत नाही का? मग मलाही घेऊन जा सोबत आणि हा विषय संपवून टाका. असं म्हणत जाधवांनी मिश्किल टीका केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
अनेकदा हात वर करून देखील प्रश्न विचारण्याची संधी मिळत नसल्याच्या मुद्द्यावर भास्कर जाधवांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली त्यावरून फडणवीस म्हणाले की, सभागृहात अध्यक्षांवर आरोप करणे योग्य नाही. जाधव तुम्ही ज्येष्ठ आहात. सगळेत हात वर करतात. पण सर्वांना संधी जाऊ शकते असं नाही. जाधव यांना मुद्दाम बोलू दिले गेले नाही असं नाही. पण जाधव चिडतात. त्यामुळे त्यांच्या तोंडून काही शब्द निघून जातात असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.
बारामती जिंकण्याचा भाजपचा चंग! पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमला ‘खास’ शिलेदार
तर जाधव यांनी नार्वेकरांच्याकडे आपण चहा पिऊन येत असल्याचं सांगितल त्यावर फडणवीसांनी मिश्किल टोला लगावला. फडणवीस म्हणाले की, आता माझ्या लक्षात आलं जाधवांच्या नाराजी मागचं कारण काय? अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना चहा नाही तर केक खाऊ घाला त्यांचं म्हणण समजून घ्या. तर भास्करराव सर्वांना संधी मिळते काही कमी-अधिक झालं असेल तर अध्यक्ष त्यात लक्ष घालतील असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे.