धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक! मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : मुंबई पोलिसांना धमक्यांचे फोन येण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. आताही असाच एक धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी फोनवरून देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आज सकाळीच फोन खणखणला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने मुंबई ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

यानंतर कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून आधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काहीच उत्तर दिले नाही. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाइल बंद केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; राऊतांच्या गंभीर आरोपांनी खळबळ!

या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे. या घटनेची माहिती तत्काळ रेल्वे प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि अवघ्या दोन ते अडीच तासात फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. फोन करणाऱ्याला अटक केल्यानंतर हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी मोबाइल नंबरच्या आधारे लोकेशन शोधून काढले. आरोपी जुहू परिसरात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांन लगेच जुहू पोलिसांना माहिती दिली. जुहू पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी हा मुंबईतील एका हॉटेलात काम करतो. तो बिहारचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्याविरुद्ध बिहारमध्येही गुन्हा दाखल आहे. आता मुंबई पोलिसांसह गु्न्हे शाखा आणि एटीएसचे पथकही तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube