मंत्रालय प्रवेश नियमांमध्ये मोठे बदल : आत्महत्या प्रयत्न अन् लाचखोरीवर शिंदे सरकारचा सर्जिकल स्ट्राईक
Maharashtra Mantralay : मुंबई : मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि लाचखोरी या दोन्ही गोष्टी रोखण्यासाठी शिंदे सरकारने (Shinde Government) जालीम उपाय शोधला आहे. आमदार आणि अधिकाऱ्यांसह इतरांच्या मंत्रालय प्रवेशाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. यानुसार आता प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन कलर कोडेड पास देण्यात येणार आहे. शिवाय 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे मंत्रालयाच्या आतील भागात आता ड्रोनची नजर असणार आहे. (Major changes in the rules of entry of MLAs, officers and others into the mantralay)
शासन, प्रशासन यांच्याकडून प्रलंबित प्रश्नावंर कार्यवाही होत नसल्यास सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न होतात. याशिवाय एखादे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी लाचखोरीही होत असलेले मागील काही काळात दिसून आले आहे. हे रोखण्यासाठी गृह विभागाने मंत्रालय प्रवेश आणि सुरक्षेचे नवे नियम मंगळवारी जाहीर केले, ते आता महिन्याभरात लागू होणार आहेत. या नियमांनुसार मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात येणार आहे.
सिंह आला पण गड गेला! पवारांचा विजय; पॅनेलचा पराभव : अनेक वर्षांच्या वर्चस्वाला भाजप नेत्यांचे हादरे
काय आहेत नवे नियम?
मंत्रालयातील अंतर्गत भागावर आता ड्रोनची नजर असणार.
मंत्रालयातील सर्व 25 विभागांचे टपाल मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातच द्यावे लागणार.
लोकप्रतिनिधींसोबतच सर्वांना मोबाईल अॅपवर संबंधितांच्या भेटीबाबत वेळेसाठी पूर्वनोंदणी करावी लागणार.
यानंतर अभ्यागतांना कलर कोडेड पास दिले जाणार असून ज्या विभागात काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश दिला जाणार.
पिशवी, बॅग मंत्रालयाच्या आत नेता येणार नाही.
केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न
10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करता येणार नाही.
पिशवी, बॅग किंवा 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम सुरक्षा रक्षकांनी उपलब्ध करुन दिलेल्या लॉकरमध्ये ठेवण्याची तयारी असली तरच प्रवेश दिला जाणार.
मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्याच गाड्यांना प्रवेश करता येणार.
सनदी अधिकाऱ्यांच्या गाड्यांना सचिव प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार.
आमदार आणि इतरांच्या सर्व वाहनांना बगीचा प्रवेशद्वारातून आत येता येणार.
कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे वगळता बाहेरील खाद्यापदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध.
मेट्रो सबवेमध्ये कर्मचारी व अभ्यागत यांच्या तपासणीसाठी कक्ष उभा करण्यात येणार.