Manoj Jarange : ठरलं तर! नगर-पुणे मार्गे मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांनी ‘रुट’ केला जाहीर
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील आंदोलनाची रुपरेषा सांगितली.
Manoj Jarange : मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर राजकारणात येणार का? जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
जरांगे पाटील पुढे म्हणाले, येत्या 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात आंतरवाली सराटी येथून होणार आहे. लाखो समाजबांधव पायी प्रवास करून मुंबईत येणार आहेत. या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आपल्या मुलांना आरक्षण मिळवून देण्याची ही शेवटची संधी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर गावकऱ्यांनी समाजबांधवांना सहकार्य करावं. त्यांच्या भोजनाची आणि पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
आपण ठरल्याप्रमाणे 20 जानेवारी रोजी मुंबईला निघणार आहोत आणि आरक्षण घेऊनच माघारी फिरणार आहोत. तेव्हा आंदोलनात कुणीही बाहेरचं शिरलं तर त्याला तत्काळ पोलिसांच्या हवाली करा. आपले सण उत्सव नंतर साजरे करा. सध्या मराठा आरक्षण हे एकच ध्येय असलं पाहिजे. एकदा घराबाहेर पडलं की आरक्षण घेऊनच माघारी येऊ. आंदोलनात कुणीही उद्रेक करू नका. आंदोलन शांततेत होईल याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग
असा राहिल मुंबईचा मार्ग
आंतरवाली सराटी, जालना, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, सुपा, शिरुर, वाघोली, पुणे,पुणे-मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदान अशा मार्गाने मुंबईत पोहोचणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
एकदा निघालो की माघार नाहीच
आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे मात्र क्यूरेटिव्ह पीटिशनवर आम्हाला शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला की मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार आहोत. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली, असे जरांगे पाटील काल म्हणाले होते.