मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी (24 आगस्ट) अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

MUMBAI LOCAL (2)

मुंबई : मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रविवारी (24 आगस्ट) अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रेल्वेने रविवारी (दि. २४ ऑगस्ट) विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉ (Mega Block) घोषित केला आहे.

भावी नगरसेवकांनो तयारीला लागा! पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना ठरली 

माटुंगा–मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा–मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. मुलुंडनंतर या गाड्या पुन्हा धीम्या मार्गावर येतील. गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा धावतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्याही मुलुंड–माटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्यांना मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा असेल. माटुंग्यापासून गाड्या पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्याही सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच घेतला गळफास, पोलिसांनी न्यायाधीशांनाच केले आरोपीच्या पिंजऱ्यात उभे, नेमकं प्रकरण काय? 

ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक
ठाणे–वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणइ डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात ठाणे व वाशी/नेरुळदरम्यान सर्व सेवा बंद राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या रद्द राहतील.

पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ या वेळेत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्याही रद्द राहतील.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, पायाभूत सुविधा दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली.

follow us