उद्याचा हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Untitled Design   2023 04 15T101843.874

Megablock on Harbor Marg in Mumbai cancelled : मुंबईची लाईफलाईन (Lifeline of Mumbai) असलेल्या रेल्वेच्या विविध कामांनिमित्त आणि देखभालीसाठी रेल्वे प्रवाशांकडून दर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. या मेगाब्लॉकच्या माध्यमातून रेल्वेची अनेक कामे केली जात असतात. त्यामुळं दिवसभर मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. मात्र, आता मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नित्य नियमाने या रविवारी देखील मेगाब्लॉक ठरलेला होता. पण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी रेल्वे प्रशासनाला हार्बर रेल्वे मार्गावरील या रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचं आव्हान केलं आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने मुनगंटीवरांची ही मागणी मान्य केली करत रविवारी घेतलेला मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळं आता हार्बर रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या रविवारी मेगाब्लॉकमध्ये होणारा त्रास कमी होणार आहे.

येत्या रविवारी म्हणजे, उद्या (16 एप्रिलाला) डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेच. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, स्वत: सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर येत्या रविवारी 16 एप्रिलचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल. मुनगंटीवर यांनी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्याची प्रियांका चोप्रावर टीका, थेट लावला हा अत्यंत गंभीर आरोप

रेल्वेने मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची घोषणा केली होती. मात्र महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे उद्या वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक हजर राहणार आहेत. त्यामुळं मोठी गर्दी होणार आहे. परिणामी, नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, मुनगंटीवर यांनी रविवारी कुठलाही मेगाब्लॉक नको, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रविवारच नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Tags

follow us