काँग्रेस का सोडली? शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद देवरांची पत्रातून जाहीर भूमिका

  • Written By: Published:
काँग्रेस का सोडली? शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद देवरांची पत्रातून जाहीर भूमिका

Milind Devora On Congress : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Devora) यांनी आज काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक पत्र काढून देवरा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी करून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणे, पक्षाचा सुरू असलेल्या कारभारावर देवरा यांनी सडकून टीका केली आहे. तसेच काँग्रेस का सोडली याची भूमिकाही त्यांनी जाहीरपणे मांडली आहे.

काँग्रेसशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवलं, आता शिंदेंच्या नेतृत्वात मोदींचे हात बळकट करणार; देवरांचा निर्धार

मिलिंद देवरांची भूमिका-

1) 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर मी काही धाडसी सुधारणांची तसेच त्यांच्या परिणामांना उत्तरदायी राहण्याची सूचना केली होती. २०१९ मध्ये मतदानाच्या फक्त एक महिना आधी नेमणूक झाली. त्यानंतर मी निवडणुकीतील पराभवाचे संपूर्ण दायित्व स्वीकारले, आणि माझ्या पदाचा राजीनामा दिला. मला असे वाटते की मी जेव्हा दायित्व स्वीकारले होते तेव्हाच पक्षात घडलेल्या घटनांबाबत जाब विचारण्याचा अधिकारही माझ्याकडे आपोआपच आला होता.

ज्यांना आपले पक्ष सांभाळता आले नाही ते आघाड्या करू लागेलत; विखेंचा विरोधकांवर हल्लाबोल

2) 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच्या युतीला विरोध केला होता. कारण त्याचा काँग्रेसवर घातक परिणाम होण्याची शक्यता होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारेपेक्षा वैयक्तिक फायद्याला प्राधान्य दिले जात होते आणि मी गेली चार वर्षे कुठले पाऊल उचलण्यापूर्वी सातत्याने सावधगिरी बाळगण्याचा आग्रह धरला होता.मला सातत्याने बाजूला सारले गेले असले तरी गांधी घराण्याशी आणि काँग्रेसपक्षाशी माझ्या कुटुंबाचे असलेले नाते कायम राखण्यासाठी माझी पक्षाशी बांधिलकी कायम राहिली.

3) एक दशक मी वैयक्तिक पद किंवा सत्ता न मागता पक्षासाठी विविध भूमिकांमध्ये अथक परिश्रम केले.
खेदाची बाब म्हणजे माझे वडील मुरलीभाई आणि मी अनुक्रमे 1968 आणि 2004 मध्ये ज्या पक्षात प्रवेश केला होता. त्या काँग्रेस पक्षाची आणि आजच्या काँग्रेसची सद्यस्थिती जुळत नाही. प्रामाणिकपणा आणि विधायक टीकेबद्दल कदर बाळगण्याचा अभाव असल्यामुळे वैचारिक आणि संघटनात्मक मुळापासून ते विचलित झाले आहेत.

4) एकेकेळी भारताच्या आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करणारा हा पक्ष आता औद्योगिक घराण्यांना ‘देशद्रोही’ ठरवतो आहे. ‘भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि धर्म साजरे करण्या ऐवजी जातीच्या आधारे फूट पाडणे आणि उत्तर-दक्षिण अशी दरी निर्माण करण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित झाले असल्याचा आरोपही देवरा यांनी केला आहे. केवळ सत्ता मिळवण्यातच नव्हे, तर केंद्रात विधायक विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करण्यातही त्यांना अपयश आले आहे. 20 वर्षांनंतरही मुंबई, महाराष्ट्र आणि भारताच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात असल्याचे देवरा यांनी म्हटले आहे.

5) मुंबईच्या नागरिकांचे कल्याण हे माझ्यासाठी राजकीय बांधिलकीच्या पलीकडचे आहे, म्हणून मी एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेत आहे. माझ्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीप्रमाणे धर्म, जात किंवा आर्थिक स्थितीची पर्वा न करता लोकसेवा करण्यासाठी माझा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य वापरण्याचे ध्येय असल्याचे देवरा यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक मिलिंद देवरा यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube