मॉरिसने पाच राऊंड फायर केले अन् स्वत:लाही संपवलं; नेमकं काय घडलं?

मॉरिसने पाच राऊंड फायर केले अन् स्वत:लाही संपवलं; नेमकं काय घडलं?

Moris Norovha : मुंबईतील दहीसर भागात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मॉरिस नोरोव्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत वाद मिटवून घेत ऑफिसला बोलावलं होतं. यावेळी दोघांनी एकत्र येण्याचा संकल्पही केला. मिळून एकत्र लोकांची सेवा करण्याचंही ठरलं मात्र, बोलणं संपल्यानंतर मॉरिसने पाच राऊंड फायर करत घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:लाही गोळ्या झाडून संपवलं आहे.

युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचं नूकसान; मोदी सरकारचा श्वेतपत्रिका काढत हल्लाबोल

मॉरिस नावाचा इसम दहिसर-बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत असायचा. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आणि मॉरिसची आधीपासूनच ओळख होती. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला होता. मॉरिसने आज घोसाळकर यांना ऑफिसला बोलावून घेतलं. यावेळी दोघांनीही फेसबुक लाईव्ह करत संवादही साधला होता.

फेसबुकवरील संवाद संपल्यानंतर मॉरिसने घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर करत गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये अभिषेक यांचा खून झाला. गोळीबार झाल्यानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

राज ठाकरे यांचा मोठा निर्णय! माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह एका मनसैनिकाची हकालपट्टी

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे.

दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले या 5 राऊंडपैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत. एक गोळी अभिषेक घोसाळकरांच्या डोक्यात लागल्याची माहिती असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता, त्याच व्यवहारातून गोळीबार झाल्याचं समजंतय..

दरम्यान, उल्हासनगर पोलिस ठाण्यात गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता दहीसरमध्ये गोळीबाराची घटना घडल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता घोसाळकरांवर नेमकं कोणत्या कारणाने गोळीबार झाला, मॉरिसने आत्महत्या का केली? या अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून घेण्याचं सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube