मुंबई विमानतळ कस्टमची कारवाई: 41 लाख रुपये किमतीचे विदेशी सिगारेट जप्त

मुंबई विमानतळ कस्टमची कारवाई: 41 लाख रुपये किमतीचे विदेशी सिगारेट जप्त

Mumbai Airport Police: मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने एप्रिल महिन्यात विदेशी मूळ सिगारेटच्या तस्करीचे 55 गुन्हे दाखल केले आणि 41 लाख रुपये किमतीच्या सुमारे 9,36,700 सिगारेट जप्त केल्या आहेत.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर विदेशी मोठ्या प्रमाणात आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सीमा शुल्क विभागाच्या पथकाला सतर्क करण्यात आले. सीमाशुल्क पथकाने हि कारवाई केली.

मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी विदेशी सिगारेटची तस्करी करण्याचा प्रयत्न करत असलेल्याविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 55 गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईत मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाने 41 लाख रुपये किमतीच्या 9,36,700 विदेशी सिगारेट जप्त केले आहे.

सीमाशुल्क अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्येच हि कारवाई करण्यात आली.

एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

या प्रवाशांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून विदेशी सिगारेट मिळाले. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी 9,36,700 विदेशी सिगारेट जप्त केले, ज्याची एकूण किंमत त्याची एकूण किंमत 41 लाख रुपये आहे. प्रवाशांचा त्याच तस्करीच्या रॅकेटशी संबंध आहे का, याचा कस्टम तपास करत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube