मोठी बातमी! मुंबईतील इमारतीला भीषण आग, वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू; 5-6 जण गंभीर

Mumbai Fire

Mumbai Fire News : मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर परिसरातील शांतीनगर जनकल्याण एसआरए इमारतीत आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळालेलं नाही. मात्र या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दहिसरमधील शांतीनगर येथील न्यू जनकल्याण सोसायटीतील (Mumbai Fire News) इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. इमारत एकूण 23 मजल्यांची आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची वाहने दाखल झाली. त्यांनी मोठ्या मेहनतीने आग आटोक्यात आणली अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

फर्निचर गोडाऊनला आग, दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू 

इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीनंतर येथे धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे इमारतीमधील अन्य लोक प्रचंड घाबरून गेले. इतक्यात अग्निशमन विभागाचे सात ते आठ बंब येथे दाखल झाले. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीत पसरलेल्या दाट धुरामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी आल्या. तरीही अग्निशमन विभागाने मोठ्या प्रयत्नाने इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.

रविवार सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे बहुतांश लोक घरीच होते. दुपारच्या वेळेस अचानक आग लागल्याने येथे मोठा गोंधळ उडाला. धूर पसरल्याने अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या लोकांना मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. या आगीत एका वयोवृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या जखमी लोकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या लोकांची प्रकृती गंभीर आहे.

तामिळनाडूत द बर्निंग ट्रेन! मालगाडीला भीषण आग, परिसरात आगीचे लोळ; व्हिडिओ व्हायरल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube