वरळी प्रकरण हिट अ‍ॅंड रन नाही तर खूनच; वर्षा गायकवाड यांनी पोलिसांवरच ताशेरे ओढले

वरळी प्रकरण हिट अ‍ॅंड रन नाही तर खूनच; वर्षा गायकवाड यांनी पोलिसांवरच ताशेरे ओढले

Mumbai Hit & Run : वरळी अपघात प्रकरण (Mumbai Hit & Run) हिट अॅंड रन नाही तर खून असल्याचं म्हणत खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पोलिस खात्यावरच ताशेरे ओढले आहेत. मुंबईतील वरळी हद्दीत एका महिलेला शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याने कारने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा करुण अंत झाला असून आरोपी गेल्या तीन दिवसांपासून फरार असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्देवी घटनेनंतर वर्षा गायकवाड यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गायकवाड यांनी वरळी पोलिस ठाण्यात जात पोलिसांशीही चर्चा केलीयं.

महायुतीने सेट केलं हडपसरचं गणित… वसंत मोरेंच्या एन्ट्रीने मविआतील इच्छुकांच्या गर्दीत भर

वर्षा गायकवाड म्हणाल्या, वरळी हद्दीत एका महिलेला चिरडल्याची घटना दुर्देवी आहे. वरळीतील ही घटना म्हणजे हिट अॅंड रन नाही तर खून आहे. अपघात होऊन तीन दिवस झाले आहेत, आता संबंधित व्यक्ती भेटल्यानंतर त्याच्या रक्तात मद्याचे नमुने आढळून येणार आहेत काय? संबंधित व्यक्ती बारमधून बाहेर येत असल्याचे फुटेज समोर आलेले आहेत. मात्र, पोलिसांनी अपघाताचे फुटेज पीडित कुटुंबाला दिले नसल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, ’माझ्या झोळीत…’

वर्षा गायकवाड यांनी अपघातग्रस्त प्रदीप नाखवा यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं असून पोलिसांनी या अपघातानंतर घेतलेल्या भूमिकेवर गंभीर प्रश्न गायकवाड यांनी केलायं. या अपघाताप्रकरणी पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का? असा सवालही वर्षा गायकवाड यांनी केलायं.

रंजन कुमार शर्मा पुण्याचे पोलीस सहआयुक्त, राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

‘तो’ बलात्कारी किंवा अतिरेकी आहे का?

वरळी हिट अॅंड रन प्रकरण गंभीर असून यामध्ये कोणतीच शंका नाही. विरोधकांकडून या प्रकरणी 48 तास 50 तास झाल्याचा सूर आवळण्यात येत आहे. या प्रकरणातील मुलगा अतिरेकी आहे का त्याने बलात्कार केलायं का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक होणारच आहे, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत कायद्यापुढे कोणीही मोठा नाही मग तो कोणत्या शहाचा मुलगा असो किंवा मुख्यमंत्र्यांचा, असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube