Nitesh Rane : मी जर ‘त्या’ गोष्टी सांगितल्या तर… राणेंचा राऊतांना थेट इशारा
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी राणेंनी राऊतांना थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, राऊत जर भाजपवर पुन्हा बोलले तर त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे. त्यावर मी पत्रकार परिषद घेईन. असा इशारा राणे यांनी दिला आहे.
त्यावर मी पत्रकार परिषद घेईन…
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राजाराम राऊत यांनी एक जावाई शोध लावला आहे. भाजपनेच शिंदे आणि अजित पवारांना स्क्रिप्ट दिली आहे. तसेच भाजपची कार्यपद्धती तालिबानसारखी असल्याचं राऊत म्हणाले आहेत. मात्र राऊतच मुघलांच्या वंशजांमध्ये जन्मले आहेत. तर जेव्हा बाळासाहेबांनी ब्रिटीश नंदींना खासदारकी दिली तेव्हा राऊतांनी ठाकरे कुटुंबाला संपवण्याची भाषा केली होती.
Telangana News : तेलंगणा निवडणुकीत व्यस्त, आंध्रने थेट ‘पाणी’च पळवलं; वादाचं कारण काय?
तर 2019 ला राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हणून त्यांनी पवारांना पायघड्या घातल्या होत्या. तर तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ठाकरे कुटुंबामध्ये भांडण लावण्याचं काम राऊतांना केलं. राज्यात सध्या ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब असो तर राज्यात जे काही सुरू आहे. त्यामागील सुत्रधार संजय राऊत आहे. त्यामुळे राऊत जर आता भाजपवर बोलले. तर त्यांच्या घरातील काही गोष्टी मी समोर आणेन. त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे. त्यावर मी पत्रकार परिषद घेईन. असा इशारा राणे यांनी दिला आहे.
अजितदादांच्या दाव्यावर पवार गटाचा पहिला वार; लढणार की लढल्यासारखं दाखवणार याकडे लक्ष
तसेच पुढे बोलताना राणे म्हणाले की, संजय राऊतांनी माझे वडिल नारायण राणे यांचं देखील पूर्ण नाव घेतलं. ती राणेसाहेबांचं काम आहे. त्यामुळेच त्यांना त्यांचं आदराने पूर्ण नाव घ्यावचं लागलं. ज्या प्रमाणे मी राऊतांचं पूर्ण नाव घेतो. हा त्याचाच परिणाम आहे. असंही यावेळी राणे म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जत खालापूर येथील विचारमंथन शिबिरात अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी उत्तरे दिल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचे आरोप म्हणजे ही भाजपाचीच स्क्रिप्ट होती, असे राऊत म्हणाले.