अजितदादांच्या दाव्यावर पवार गटाचा पहिला वार; लढणार की लढल्यासारखं दाखवणार याकडे लक्ष

  • Written By: Published:
अजितदादांच्या दाव्यावर पवार गटाचा पहिला वार; लढणार की लढल्यासारखं दाखवणार याकडे लक्ष

Jayant Patil On Ajit Pawar : कर्जत येथील अजित पवार गटाच्या वैचारिक मंथन शिबिरात अजित पवारांनी लोकसभेच्या चार जागांवर दावा ठोकला आहे. शिरूर, रायगड, मावळ आणि बारामती या जागा लढवणार असल्याचे सांगत अजितदादांनी लोकसभेसाठी एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता पवारांच्या खास शिलेदारानं पहिला वार करत अजितदादांना डिवचलं आहे. अजितदादांचा गट खरचं जागा लढवणार की लढवल्यासारख करणार याकडे आमचं लक्ष असल्याचे जयंत पाटालंनी (Jayant Patil) म्हटले आहे. त्यांचे हे विधान ऐकता शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या दाव्यावर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या सारखे आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Nitesh Rane : मी जर ‘त्या’ गोष्टी सांगितल्या तर… राणेंचा राऊतांना थेट इशारा

योग्य वेळ आली की बोलणार

यावेळी प्रकाश सोळंखेंच्या मुद्यावर तसेच अन्य करण्यात आलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) गौप्यस्फोटांबाबत आपण योग्य वेळ आली की बोलणार असल्याचे जयंत पाटलांनी यावेळी सांगितले. बऱ्याच गोष्टींची कामात केलेल्या कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते. त्यामुळे अजितदादांनी जे काम केले, कृती केली त्यासाठी अधून-मधून ते भाषण करून स्पष्टीकरण देतात. आम्ही ते ऐकतो फक्त या सर्वांवर आपण योग्य वेळी आली की सर्व सांगेल असे ते म्हणाले.

Sanjay Raut : अजितदादा नाही ही भाजपाचीच स्क्रिप्ट; शरद पवारांसाठी राऊत मैदानात

अजित पवारांनीच सोळंखेंना शब्द दिला होता

यावेळी प्रकाश सोळंखेंबाबत अजित पवारांकडून करण्यात आलेल्या दाव्यांवरदेखील भाष्य केले.  प्रकाश सोळंखे राजीनामा देत होते पणं मी त्यांना बोलावलं. एवढेच नव्हे तर, अजित पवारांनी माझ्यासमोरच सोळंखेंना तुम्हाला पक्षाचा कार्याध्यक्ष पद देतो असा शब्द माझ्यासमोर दिला होता. पण नंतर मला कधी पक्षाने याबाबत काही सूचना किंवा आदेश दिले नसल्याचा खूलासा जयंत पाटलांनी केला. आपल्याला पक्षाने पदाचा राजीनामा द्यायला सांगितला असता तर मी तो नक्कीच दिला असता असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

लोकसभेपूर्वी येणार दोन महत्त्वाचे कायदे; अजितदादांनी दिले सूतोवाच

जिव्हाळा असता तर…

भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर ज्यावेळी अजित पवार गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यावेळी अजितदादांना सोळंखेंची नाराजी दूर करण्याची संधी आली होती. अजितदादांना सोळंखेंबाबत खरचं जिव्हाळा असता तर, त्यांनी सोळंखेंना मंत्री केलं असतं, परंतु तसे झाले नाही. प्रकाश सोळंखे आमच्याकडे आले तर, आम्ही त्यांचं गणित बसवूच, पण ते येतील की नाही याबाबत आतातरी सांगणं कठीण आहे.

पवारांवरील गौप्यस्फोटावर सूचक उत्तर 

यावेळी जयंत पाटलांना शरद पवारांच्या राजीनामा नाट्य आणि आंदोलनावर  विचारले असता ते म्हणाले की, या गोष्टीबाबत आपल्याला काही माहिती नाही. ज्या दिवशी पवारांनी राजीनामा देणार ही घोषणा केली त्यावेळी आंदोलन, राजीनामा असं काही ठरलेलं नव्हतं. आंदोलन करा असं कोणी कोणाला आदेश दिले नव्हते असे सूचक उत्तर देत यावर आता नव्हे तर निवांत बोलेन असं सूचक उत्तर जयंत पाटलांनी दिले.

मोदी, राहुल गांधींनाही OBC समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा

मुख्यमंत्री पद जाणार यामुळे शिंदेंचं कुणी ऐकत नाही

येत्या काही दिवसात एकनाथ शिंदे पायउतार होतील आणि अजितदादा मुख्यमंत्री होतील असे भाकित ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शिंदे जाणार जाणार म्हणून ज्या वावड्या उठवल्या जात आहेत. त्यामुळे  प्रशासनातील अधिकारी त्यांचे ऐकत नाही. एवढेच नाही तर, शिंदे कधी जाणार म्हणून IAS अधिकारी IPS ऐकायच्या मनस्थितीत नाही. ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. अशा खोट्या वावड्या उठवून शिंदेंची रात्रीची झोप लागू देत उगाच त्यांना त्रास देऊ नका अशा चुकीच्या बातम्यांमुळे सगळं सरकारचं ठप्प होत. त्यामुळे एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणं योग्य नसल्याचे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube