मुख्यमंत्री कार्यालयावरील आरोप संजय राऊतांना भोवणार; पोलिसांनी घेतली अ‍ॅक्शन

मुख्यमंत्री कार्यालयावरील आरोप संजय राऊतांना भोवणार; पोलिसांनी घेतली अ‍ॅक्शन

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाबाबत त्यांनी केलेल्या आरोपांशी संबंधित पुरावे सादर करण्यास त्यांना या नोटिसीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप खासदार राऊत यांनी नुकताच केला होता. (police took action against Shiv sena ubt mp Sanjay Raut on cmo allegations)

क्राईम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही संजय राऊत यांना नोटीस बजावली असून मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित आरोपांबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. संजय राऊत यांनी हे पुरावे सुपूर्द करताच या प्रकरणाची चौकशी करू. मात्र राऊत यांना पुरावे सादर करण्यासाठी कोणताही विशिष्ट दिवस आणि वेळ देण्यात आलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. राऊत यांनीही आपण लवकरच याबाबत पुरावे सादर करु असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

शिवसेनेच्या तीन आमदारांचे शेवटचे अधिवेशन ठरणार? ठाकरे गटाने आखली आक्रमक व्यूहरचना

काय म्हणाले होते संजय राऊत?

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारांशी कसा संवाद सुरु आहे याची माहिती मी देणार आहे. सरकारमधील लोक मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या तुरुंगातील अनेक भयंकर कैद्यांशी संवाद साधून आहेत. काही लोकांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. तुरुंगातून मोबाईलचा वापर सुरु आहे. तुरुंगाच्या दारात कैद्यांची भेट घेतली जात आहे. 302 च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरु आहे, असा आरोप करत आपण याबाबतचे पुरावे लवकरच सादर करु असं संजय राऊत यांनी म्हंटलं होतं.

Anant Kalase : विरोधी पक्षनेतेपद ‘या’ पक्षाकडे जाणार; अन्यथा विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन होणार

याशिवाय झाकीर नाईक याच्यावर टेलर फंडिंगचा आरोप आहे. त्याच्याकडून विखे पाटलांच्या खात्यात पैसे गेले त्यांच्यावर काय कारवाई झाली का? आमदार राहुल कुल यांचं काय झालं? दादा भुसे गिरणा सहकारी साखर कारखाना काय कारवाईचं काय झालं? 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा कालपर्यंत तुम्ही बोलत होतात आज त्यांच्यासोबत सत्तेत बसलात. त्या आरोपांचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube