आपल्या राज्याविषयी मनात प्रेम…; UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा मिश्कील टोला

आपल्या राज्याविषयी मनात प्रेम…; UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा मिश्कील टोला

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात युपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी एक घडलेला किस्साही सांगितला.(pune IAS Officers interacting Raj Thackeray difficult comment upsc students)

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या मनातून महाराष्ट्र जाता कामा नये. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. तेव्हा त्यांच्या काळात घडलेला एक किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रात येणार होता. मात्र विलासराव देशमुख यांना वेळ नव्हता. त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, बीएमडब्ल्यूचे डेलिगेशन येत आहेत.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…

हा कारखाना आपल्याकडे आला पाहिजे, त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलून घ्या. तोपर्यंत सर्व व्यवस्थित होतं. मात्र ज्यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली होती, ते दाक्षिणात्य अधिकारी होते. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या दुसऱ्या कामासाठी गेल्यानंतर बीएमडब्ल्यूचे डेलिगेशन महाराष्ट्रात आले.

जशी त्यांची बैठक सुरु झाली तशी त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी नन्नाचा पाढा वाचायला सुरुवात केली. जागा हस्तातरणाला वेळ लागेल इथपासून तर थेट वीजपुरवठा करता येणार नाही, टॅक्स आदी गोष्टींवर नाही असंच उत्तर त्यांना देण्यात आलं. त्यामुळं अर्थातच बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना इतकं निराश केलं की, ते बीएमडब्ल्यूचे अधिकारी थेट निघाले. व्हिजिटिंग कार्डची अदलाबदली झाली होती.

त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी तमिळनाडूमधील त्यांच्या सहकाऱ्यांना फोन लावला आणि सांगितले की ते बीएमडब्ल्यूचे अधिकारी आत्ताच इथून निघून गेले आहेत.
हे त्यांचे नंबर आहेत, आता त्यांना संपर्क साधून त्यांना बोलावून घ्या. आणि त्यानंतर बीएमडब्ल्यूचा कारखाना तमिळनाडूमध्ये गेला.

त्या घडलेल्या सर्व घटनेवरुन राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात आपल्या राज्याविषयी प्रेम असतं. तुमच्याही मनात राज्याविषयी प्रेम असलं पाहिजे. ठासून भरलेलं असलं पाहिजे. उद्या तुम्ही देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात जाल तरीही आपल्या राज्याचा महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

या उपर तुम्ही सुज्ञ आहात. लोकशाही कशाला म्हणतात. हे तुम्हाला आज कळलं असेल. ज्याला दहावीला 42 टक्के पडले तो आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा, असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टिपणी देखील केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube