“बापानं नाक रगडलं म्हणून खासदार केलं”, श्रीकांत शिंदेंबद्दल राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य

“बापानं नाक रगडलं म्हणून खासदार केलं”, श्रीकांत शिंदेंबद्दल राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Raut Criticized Shrikant Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्याचा बाप आला आणि बोलला माझा मुलगा बेरोजगार आहे. त्यांना खासदार बनवा म्हणून नाक रगडत होते अशा शब्दांत शिंदे पिता पुत्रावर राऊतांनी निशाणा साधला. राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांचाच समाचार घेतला.

वन नेशन वन इलेक्शन, सेक्यूलर कोड अन् भ्रष्टाचारावर प्रहार.. वाचा, मोदींच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे

श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा

राऊत पुढे म्हणाले, फालतू माणूस आहे (श्रीकांत शिंदे) तो ज्याला उद्धव ठाकरेंनी खासदार केलं त्याचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्रही तपासा. तो माकडाचा मुलगा आहे. ज्यांनी एक पार्टी चोरली आहे बाळासाहेब ठाकरे यांची ज्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांनी एमपी बनवला त्याची औकात नव्हती. त्याचा बाप आला आणि बोलला की माझा मुलगा बेरोजगार आहे. माझ्या मुलाकडे काही काम नाही. त्याच्याकडे डॉक्टरांची डिग्री आहे पण हॉस्पिटल चालू शकत नाही. त्याच्याकडे मेडिकल शिक्षण नाही परंतु तो डॉक्टर आहे तुम्ही त्यांना एमपी बनवा नाक रगडत होते. अशी व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात त्यांना लाज आली पाहिजे बेशरम आहेत असे राऊत म्हणाले.

राज्यात तीन घाशीराम कोतवालांचं राज्य

देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस आणि त्यांचे लोक काम करत आहेत. अनागोंदी, अराजक, लुटमार हे सर्व घाशीराम कोतवाल आहेत तीन. या तीन घाशीराम कोतवाल यांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. घाशीराम कोतवाल यांचा इतिहास काय आहे हे आम्ही महाराष्ट्राला आता लवकरच सांगू.

महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू. महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का या महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षांपेक्षा जास्त काळ याच्यात मुख्यमंत्री होऊन गेले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर तुम्ही या राज्याचे महाराष्ट्राचा महाभारत समजून घ्यावं.

संजय राऊत दुतोंडी साप, त्यांचा बंदोबस्त.. गुलाबी सरडा टीकेवरून अजितदादा गट आक्रमक

या महाराष्ट्रात ही योजना बंद करु जे सुडाचं राजकारण आहे ते फडणवीस यांनी सुरू केले आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल ही त्यांची भीती आहे. आम्ही हरतो आहोत ही त्यांची भीती आहे म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते चांगल्या राज्यकर्त्याची नसते.

मोदींनी नवीन काहीच केलं नाही

नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नाव बदलून काँग्रेसच्या योजना चालवलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी काहीही केलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षानुवर्ष व गरिबांच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्यायाच्या बाबतीत या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली आणि चालू केल्या. योजना त्याच आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळ्याला सुरुवात करावी. महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरड डर्टी पॉलिटिक्स या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अंत आता जवळ आला आहे एवढेच मी सांगतो असे राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube