गद्दारी, स्वार्थ कधी मनाला शिवला नाही म्हणत टॅक्सीचालकाने तीन लाख केले परत
मुंबई : पैसा दिसला की अनेकांचे डोळे पांढरे होतात. त्यात लाखोंनी पैसे सापडले तर अनेक जण इमानदारीचा ठेवा कपड्यात गुंडाळून खुंटीलाही टांगतील. पण एका टॅक्सीचालकाने प्रामाणिकपणाने इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.
आसामहुन कॅन्सरवर उपचारासाठी आलेला रुग्ण पैशांची बॅग टॅक्सीमध्ये विसरला होता. हीच लाखो रुपयांची बॅग टॅक्सीचालकाने प्रवाशाला सर्वांच्या साक्षीने परत केली आहे.
Chandrakant Patil यांच्यावर धंगेकरांची उपरोधिक टीका… म्हणाले ते तर संत… त्यांना घरी जेवायला बोलवेन!
त्याचं झालं असं की, शांताराम शेलार हे मुंबईत मागील अनेक वर्षांपासून एक टॅक्सी चालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या टॅक्सीमध्ये एक आसामचे कुटुंब प्रवास करत होते. त्यांना शेलार यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये जायचे होते. त्यासाठी त्यांना परळ इथं उतरवण्यात आले.
त्यानंतर शेलार परळहुन वडाळाकडे पुन्हा येत होते. त्याचवेळी नवीन प्रवासी गाडीत बसत असताना त्यांनी विचारलं ही पर्स आणि फाईल कुणाची? तेव्हा शेलार यांच्या लक्षात आलं की हे आसामच्या प्रवाशाचं आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीआधी शरद पवारांची भूमिका स्पष्ट…
शेलार यांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोने आणि काही कागदपत्रे होती. हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना काही काळ सुचेनासे झाले. त्यानंतर त्यांनी थेट आसाम भवन गाठत सदरील प्रवाशाचा तपास घेतला.
अखेर तपासानंतर सर्वांच्या साक्षीने टॅक्सीचालक शेलार यांनी आसामच्या कुटुंबांना पैशांनी भरलेली बॅग परत केली. एका टॅक्सीचालकाची इमानदारी पाहत आसामचं कुटुंबही यावेळी गहिवरलं होतं. याच पार्श्वभूमीवर लेट्अप प्रतिनीधींनी शेलार यांच्याशी संपर्क केला असता याआधीदेखील असं बऱ्याचदा घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
…तर आम्ही महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, राहुल गांधी वादात हिंदू महासभेची उडी
या घटनांमध्ये ‘गद्दारी स्वार्थ मनाला शिवला नाही कधी, कष्टाच खूप आहे’ असं शेलार यांनी ठामपणे सांगितलं आहे. घरी बायकोला समजल्यानंतर बायकोनेही असे पैसे आपल्याला नको बर झालं परत दिलं असं पत्नीने त्यांना सांगितल्याचं शेलारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शेलारांची हीच इमानदारी पाहुन मुंबईतील टॅक्सीचालकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दलची ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असून अनेकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.