कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिरच; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही मंदिरच; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

Durgadi Fort : मागील अनेक वर्षांपासून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर (Durgadi Fort) मंदिरच असल्याचा निर्वाळा कल्याण सत्र न्यायालयाकडून देण्यात आलायं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवरील ऐतिहासिक महत्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा केलायं.

Bangladesh Violence : …तर मुस्लिमांना ‘लाडकी बहिण योजने’तून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार

मागील काही वर्षांत बकरी ईदच्यावेळी समुदायाकडून दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज अदा करण्यात आली होती. या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेऊन आतील घंटा बांधली जायची. या प्रकारावरुन हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. जून महिन्यात शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केले होते. मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, तोपर्यं आंदोलन सुरुच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी यावेळी घेतला होता. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जायची.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या घटनेचा विरोध करीत घंटानाद आंदोलन केलं होतं. यावर्षीही या किल्ल्यावर घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनावेळी पोलिस प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्यावर ऐतिहासीक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवाची मोठी परंपरा आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कल्याणकरांसह ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये लाखो भक्तांची गर्दी होते.

दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास काय?
सातवाहन काळापासून कल्याण हे एक महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जात होते. 1657 पर्यंत कल्याणचा ताबा आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचे महत्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील करून घेतले. या भागाचे भौगोलिक महत्व जाणून छत्रपतींनी कल्याणमधील खाडीकिनारी किल्ला बांधण्याचे ठरविले. किल्ल्याचे बांधकाम करताना महाराजांना तिथे अमाप संपत्ती सापडली. देवी दुर्गेच्या आशीर्वादानेच ही संपत्ती सापडल्याचे समजून महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले आणि त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव पडल्याचे इतिहासतज्ञ सांगतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube