फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, उद्धव ठाकरेंना हल्लाबोल
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा शाळेतील अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे, अशी टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारला होता की कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून गाळला आहे. यावर उद्धव ठाकरेंच मत काय? देवेंद्रजी, तुमची परिस्थिती खुप हालाकीची आहे. पूर्वी एक जाहिरात यायची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्या जाहिरातीचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. होणारे अपमान सहनही होत नाहीत अन् सांगताही येत नाही कारण वरुन आदेश आहे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केली आहे.
Sanjay Raut : 50 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारला श्रध्दांजली; ईडीच्या भयाने फडणवीसही शिवसेनेत येतील
ते पुढं म्हणाले की सावरकरांचा धडा वगळला याचा शिवसेना निषेध करत आहे. ज्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट केले म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी जो देश स्वातंत्र्य केला त्या देशाला ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडा खाली आणू इच्छिते त्याचा बद्दल तुमचे मत काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्तांचे हत्यार? आदित्य ठाकरेंचा कडक इशारा
सावरकारांनी हालपेष्टा आणि कष्ट भोगले होते ते मोदी आणि फडणवीसांसाठी भोगले होते का? क्रांतीकारक फासावर गेले, स्वत:च्या छाताडावर गोळ्या झेलल्या होत्या ते काय तुमच्यासारख्या अवलादी पैदा करण्यासाठी? जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर देश आपल्या बुडाखाली घेणाऱ्या नेत्यांचा धिक्कार करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.