तेल कारखान्यात टँकर साफ करताना 7 कामगारांचा गुदमरून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना

  • Written By: Published:
तेल कारखान्यात टँकर साफ करताना 7 कामगारांचा गुदमरून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना

चित्तूर : आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात कामगारांचा मृत्यू (7 workers died of suffocation) झाला आहे. पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा (Ragampeta) गावातील एका तेल कारखान्यात आज (दि. 9)  टॅंकरची साफसफाई (Tanker cleaning) सुरू असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मजूरांना टॅंकरची सफाई करण्यास सांगितले. एक मजूराने मॅनहोलमधून प्रथम टँकरमध्ये प्रवेश केला. परंतु, काही वेळ त्याने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने अन्य तीन मजूर टँकरमध्ये उतरले. मजुर टॅंकरमध्ये उतरताच त्यांना देखील श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर अन्य तीन मजूर त्यांना वाचवण्यासाठी टॅंकरमध्ये चढले. मात्र, विषारी वायूमुळे ते सर्व बेशुद्ध पडले. यानंतर शिवकुमार रेड्डी खाली उतरले. त्यांनाही श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला, म्हणून ते ओरडू लागले. यानंतर सर्व मजुरांना बाहेर काढून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी 6 मजूरांना मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान 7 व्या मजुराचा मृत्यू झाला. तर शिवकुमार रेड्डी (43) यांची तामिळनाडूतील वेलुरू येथे बदली करण्यात आली.

Soaked Cashews: पाण्यात भिजवलेले काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर

मृतांमध्ये एम रमेश (32), जी गोविंदा स्वामी (35), बी रामचंद्र (23), ए रेडप्पा (30), आर बाबू (30), अय्यम रेड्डी पल्लेक केशव (20) आणि बी व्यंकट राजुलू (23) यांचा समावेश आहे. हे सर्वजण 10 दिवसांपूर्वी नोकरीवर रुजू झाले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर कंपनीने 15 लाख रुपये एक्स-ग्रेशिया देण्याचे मान्य केले आहे. विषारी वायूमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube