Video: भगवानाची मूर्ती अंगावर पडून 9 जण जखमी; पुरी रथ यात्रेतील व्हिडिओ आला समोर
Puri Rath Yatra : ओडीसातील पुरीमध्ये रथ यात्रा सुरू आहे. येथे भगवान बलभद्रची मूर्ती अंगावर पडून जगन्नाथ मंदिराचे किमान ९ सेवक जखमी झाले आहेत. यावेळी अपघाताने भगवान बलभद्रची मूर्ती सेवकांच्या अंगावर पडली. काल रात्री उशीरा ही घटना घडली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. रथामधून मूर्ती मंदिरामध्ये ठेवली जाणार होती. सेवकांनी मूर्तीला उचलले पण त्यांना त्यांचा तोल गेला अन् ती अंगावर पडली. यात जवळपास ९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मूर्ती आवरली नाही
नऊ पैकी पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, इतर चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. पहंडी विधी करत असताना हा अपघात घडला. व्हिडिओ पाहून समजतंय की, ज्या सेवकांकडे भगवानाची मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी होती त्यांचा तोल गेला त्यामुळे हा अपघात घडला अशी माहिती पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वेन यांनी दिली.
गांभिर्याने लक्ष घालण्याच्या सुचना
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांना घटनास्थळी तात्काळ भेट देण्याचे आदेश त्यांनी दिल. तसंच, सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितलं आहे. पुरी भगवान जगन्नाथ मंदिर हे राज्य सरकारच्या कायदा विभागाच्या अखत्यारीत येतं. मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीत सर्व विभागांना गांभिर्याने लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पुरीमध्ये भगवान बलभद्रची मूर्ती अंगावर पडून जगन्नाथ मंदिराचे किमान ९ सेवक जखमी झाले आहेत. पुरीमध्ये रथ यात्रा सुरू आहे. #lordbalabhadra #JayJagannath #pooriii pic.twitter.com/rI0A5MUSch
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 10, 2024